खरेदीच्या बहाण्याने दुकानातूनच सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास ; तीन महिलांचा समावेश

three thief woman arrested by police for case of robbery in jewellery shop in kolhapur
three thief woman arrested by police for case of robbery in jewellery shop in kolhapur
Updated on

कोल्हापूर : दसरा चौकातील ज्वेलर्स दुकानातून खरेदीच्या बहाण्याने तीन महिलांनी सोन्याच्या बांगड्या लंपास केलेल्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला. याप्रकरणी तीन महिलांसह चौघा परप्रांतियांना २४ तासांत अटक केली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले. त्यातील साडेदहा तोळे सोन्याचे दागिने आणि मोटार असा सव्वाअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत  दिली. 

याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एजाज रियाझ खान (वय ३३, रा. बंगरूळ), संजू रवींद्र गुप्ता (३५, रा. कानपूर, उत्तर प्रदेश), सरिता राजाराम शर्मा (२५), आयुषी गुलाब शर्मा (२५, दोघे रा. सोनभद्र, उत्तर प्रदेश, सध्या रा. मुंबई) यांचा समावेश आहे. 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्समध्ये मंगळवारी दुपारी तीन महिला रिक्षातून आल्या. खरेदीच्या बहाण्याने त्यांनी ३७ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या हातोहात लंपास केल्या.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली होती. दुकानातील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला होता. त्याआधारे पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. संशयित महिला कोठे रिक्षात बसल्या, कुठे उतरल्या याचे तपशील मिळविले. दरम्यान, त्या महिला शाहूपुरी बेकर गल्ली परिसरातील हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येथे सापळा रचला. त्यात एका आलिशान मोटारीतून संशयित तिन्ही महिला आणि एक पुरुष पोलिसांच्या हाती लागला. महिलांकडील पर्सची पोलिसांनी झडती घेतली. त्यात चोरीच्या बांगड्या आढळल्या. 


तपासात आणखी दोन गुन्हे उघड

संशयितांनी त्यांची नावे एजाज खान, संजू गुप्ता, सरिता शर्मा व आयुषी शर्मा असल्याचे पोलिसांना सांगितले. चौकशीत त्यांनी कोल्हापुरात येण्यापूर्वी कोरेगाव पार्क पोलिस ठाणे व पुणे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तनिष्क ज्वेलर्समध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील एकूण सव्वापाच लाख रुपये किमतीचे साडेदहा तोळे सोन्याचे दागिन्यांसह सहा लाखांची मोटार पोलिसांनी जप्त केली. 


तपासाचे शिलेदार

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, पोलिस चंदू नन्नवरे, सचिन गुरखे, नितीन चोथे, वसंत पिंगळे, सोमराम पाटील, रवींद्र कांबळे, संजय पडवळ, वैशाली पाटील, सुप्रिया कात्रट यांनी कारवाईत भाग घेतला.
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.