साखर उद्योगाला दिलासा ; इथेनॉल दरवाढीवर केंद्राची मोहोर

Union Cabinet approved the hike in ethanol price
Union Cabinet approved the hike in ethanol price
Updated on

कोल्हापूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज इथेनॉलच्या दरवाढीला मंजुरी दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर कमी असल्याने तो वाढवून मिळण्याची शिफारस तेल मंत्रालयाने याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाकडे केली होती. त्यानुसार ही वाढ केली असून, इथेनॉलच्या सध्याच्या दरात सरासरी अडीच ते सहा टक्‍क्‍यांची वाढ केली आहे.


गेल्या वर्षीच्या हंगामात इथेनॉलचे दर निश्‍चित केले होते. त्यात इथेनॉल निर्मितीच्या प्रक्रियेनुसार प्रतिलिटर १.९४ रुपयांपासून ३.३४ रुपयांपर्यंत दरवाढीची शिफारस प्रस्तावात आहे. बी-हेवी, सी-हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केले जाते. इथेनॉलसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे मोलॅसिस व उसाच्या रस दरात वाढ झाली आहे. याशिवाय, इथेनॉलनिर्मितीचा प्रक्रिया खर्च, प्रकल्प उभारणीचा खर्च, त्यासाठी घेतलेले कर्ज व व्याज याचा ताळमेळ घालायचा झाल्यास इथेनॉलच्या दरात वाढ व्हावी, अशी मागणी खासगी आणि सहकारी इथेनॉलनिर्मिती कारखान्यांकडून वारंवार होत होती.


यंदाच्या हंगामात उसाच्या एफआरपीच्या दरात प्रतिटन १०० रुपयांची वाढ झाली आहे. इथेनॉलनिर्मितीत वाढ झाल्यास साखर उत्पादन कमी होईल. त्यातून साखरेच्या अतिरिक्त साठ्याचा प्रश्‍नही निकालात निघणार आहे. त्यामुळेच इथेनॉलच्या दरात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती.


देशात राबविण्यात येत असलेल्या जैवइंधन कार्यक्रमांतर्गत २०२२ पर्यंत इंधनात १० टक्के इथेनॉलमिश्रण बंधनकारक आहे; तर २०३० पर्यंत हेच प्रमाण २० टक्के करावे लागेल. याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अतिरिक्त साखरेचे उत्पादन होऊन कारखान्यांसमोर येणाऱ्या अडचणींवर मात करणे शक्‍य आहे. याशिवाय, इंधन आयातीवर होणारा परदेशी चलनाचा खर्चही कमी होईल.

इथेनॉल दरात वाढ अशी (आकडे प्रतिलिटर रुपयांत)
इथेनॉलचा प्रकार    सध्याचे दर    वाढीची शिफारस    प्रत्यक्षात वाढ    प्रत्यक्षात झालेली वाढ       दरवाढीचे 
प्रमाण
बी-हेवी मोलॅसिस     ५४.२७    ३.३४     ३.३४    ५७.६१    ६.२ टक्के    
सी-हेवी मोलॅसिस    ४३.७५    १.९४     १.९४     ४५.६९    ४.४ टक्के
उसाच्या रसापासून    ५९.४८    ३.३४    ३.१७     ६२.६५    ५.३
 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.