सोलापूर : सोलापुरात सद्यस्थितीत नऊ लाख 73 हजार 913 वाहने असून त्यामध्ये मागील तीन वर्षांपासून दरवर्षी सरासरी 60 हजार वाहनांची भर पडत आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पियुसी केंद्रांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे आर्युमान संपलेली वाहने व पियुसी नसलेली नियमबाह्य वाहने बिनधास्तपणे रस्त्यांवर धावत असल्याचे चित्र आहे. हवा प्रदूषित होऊन धोक्याची पातळी ओलांडू लागली असून अशा वाहनांवरील कारवाईसाठी विशेष मोहीम राबवावी, असे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आरटीओ व शहर वाहतूक पोलिस यंत्रणेला देणार आहे.
हेही नक्की वाचा : गूड न्यूज...कर्जमाफीची पहिली यादी 15 फेब्रुवारीला...पण
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहितीनुसार एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत सोलापुरात 65 हजार 51 वाहने वाढली आहेत. तर एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत 47 हजार 893 वाहनांची विक्री झाली आहे. दरवर्षी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर भर पडत असतानाच दुसरीकडे नियमबाह्य वाहने रस्त्यांवर धावत असल्याचे दिसून येते. दरम्यान, शहरातील रस्त्यांवरील दुभाजकांवरील माती कमी करावी, रस्त्यांलगतची धूळ नियमित स्वच्छ करावी, रस्त्यांची कामे सुरु असलेल्या ठिकाणी धूळ होऊ नये म्हणून नियमित पाणी मारावे, अशा सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला केल्या. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरु केली आहे. मात्र, हवा प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये वाहनांचाही समावेश असून आर्युमान संपलेल्या वाहनांवरील कारवाईकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहिलेले नाही, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासाठी दोन्ही यंत्रणेने काय उपाययोजना केल्या आहेत, पियुसी नसलेल्या व आर्युमान संपलेल्या किती वाहनांवर दरमहा कारवाई केली, याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ मागवून घेणार आहे.
हेही नक्की वाचा : सहाशे कोटींच्या खर्चानंतरही कर्करुग्ण वाढलेच...राज्याची स्थिती जाणून घ्या
हवा ओलांडू लागलीय धोक्याची पातळी
शहरातील हवा धोक्याची पातळी ओलांडू लागली आहे. महापालिकेला पत्र दिल्यानंतर त्यांनी कार्यवाही सुरु केली आहे. शहर वाहतूक पोलिस यंत्रणा व आरटीओ विभागाने आर्युमान संपलेल्या तथा पियुसी नसलेल्या वाहनांवरील कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. त्याबाबतचे पत्र दोन्ही विभागांना दिले जाणार आहे.
- प्रदिप भोसले, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सोलापूर
हेही आवश्य वाचा : जीएसटी अनुदानावर चालतोय महापालिकेचा गाडा...कोणती महापालिका नक्की वाचा
नियमबाह्य वाहनांवरील कारवाईसाठी विशेष मोहीम
सोलापुरातील मुदत संपलेल्या स्क्रॅप वाहनांवर सातत्याने कारवाई सुरु आहे. प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या तथा पियुसी नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. हवा शुध्द राहावी या हेतूने नियबाह्य वाहनांवरील कारवाईसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
हेही नक्की वाचा : बळीराजासाठी गूड न्यूज...अवकाळीग्रस्तांसाठी सरकारचा मदतीचा हात
सोलापूरची स्थिती
पियुसी सेंटर
64
वाहनांची संख्या (जानेवारी 2020 पर्यंत)
9,73,913
दरवर्षी सरासरी वाहनांची तपासणी
65,000
दरमहा वाहनांवरील कारवाई
1,500
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.