सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीतील गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 257 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 70 नवे कोरोना बाधित सापडले असून 1 हजार 180 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 118 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
महापालिका हद्दीतील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 6 हजार 885 झाली असून 184 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये शेळगी परिसरातील महालक्ष्मी सोसायटी, वसंत विहार, सोमवार पेठ मारुती मंदिराजवळ, मुरारजी पेठेतील यश नगरं, भावनाऋषी क्वॉटर्स, जुळे सोलापुरातील लक्ष्मी नगर, विजापूर रोड वरील कोळी सोसायटी, दहिटणे, दक्षिण सदर बझार, जुळे सोलापुरातील समर्थ नगर, जुना पुना नाका, निर्मिती विहार, शेळगीतील महेश थोबडे नगर, गोल्डफिंच पेठ दत्त चौक, मिलिंद नगरओ, गणेश आपार्टमेंट गीता नगर, कल्याण नगर भाग-2, विजापूर रोडवरील राजस्वनगर, वृंदावन हौसिंग सोसायटी, विजापूर रोडवरील द्वारकानगर, जुळे सोलापुरातील संतोष नगर, जुळे सोलापुरातील विश्वेश्वरय्या सोसायटी, सिद्धेश्वर पेठ, टिळक चौक, लष्करमधील जगदंबा चौक, शेळगीतील बनशंकरी नगर, रेल्वे लाइन्स येथील क्षमा अपार्टमेंट, वालचंद कॉलेजच्या मागील स्वातंत्र्यसैनिक नगर, बुधवार पेठेतील आयोध्या नगर, तेलंगी पाच्छा पेठ, उत्तर कसब्यातील हिरेहब्बू कॉम्प्लेक्स, एसआरपी कॅंप सोरेगांव, रामलाल चौक, मोदी येथील कस्तुरबा गांधी नगर, प्रतिक नगर, शेटे नगर, विजापूर रोडवरील इंदिरानगर, महालक्ष्मीनगर, शेळगी येथील सुंदरनगर, प्रधान हॉस्पिटल जवळ, साखरपेठ, विजापूर रोडवरील रेल्वे सोसायटी, जुळे सोलापुरातील वीरशैवनगर, उत्तर कसबा येथील चांभार गल्ली, शेळगी, मार्कंडेय सोसायटी, गोंधळी वस्ती शेजारील जुना रंगराज नगर, हैदराबाद रोड वरील घरकुल, पश्चिम मंगळवार पेठ, लक्ष्मी पेठेतील शेटे नगर, भारती विद्यापीठजवळ, मजरेवाडीतील कल्याणनगर, मुरारजी पेठेतील उमा नगरी, मोदीखाना येथील नरसिंह नगर, जोडभावी पेठ, कर्णिकनगर, मल्लिकार्जुन नगर, मुमताज नगर, मुरारजी पेठेतील एन. जी. मिल. चाळ, बिलालनगर, जुळे सोलापूर येथील चाकोते नगर याठिकाणी नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 425 झाली असून रुग्णालयात सध्या 619 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या पाच हजार 841 झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.