सोलापूर : लॉकडाउन झाले, आता कोरोनाशी लढताना उद्योग, व्यवसाय व कामगारांच्या रोजीरोटीचा विचार व्हायला हवा. कारण, गेल्या चार महिन्यांपासून सोलापुरातील उद्योग-व्यवसाय कधी सुरू तर कधी बंद राहिल्याने कोट्यवधींचा फटका उद्योजकांना बसला आहे. त्यातच हातावर पोट असलेल्या विडी, यंत्रमाग व गारमेंट उद्योगातील कामगारांचेही मोठे हाल झाले आहेत. आता विनाखंड व पूर्णवेळ उद्योग-व्यवसायास परवानगी मिळाली तरच सोलापुरातील कोरोनामुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण निवळून आर्थिक चक्र गतिमान होऊ शकेल, याकडे आता प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
लॉकडाउननंतर उद्योग-व्यवसाय सुरळीत राहण्यासाठी व सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी यांनी लॉकडाउननंतर उद्योग-व्यवसाय सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र शासनास निवेदन दिले आहे. त्यामध्ये काही धोरणात्मक बदल होणे आवश्यक असून, शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया 5 जूनपासून सुरू झाली तेव्हापासून बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी सम-विषम पद्धतीने बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी नियम लागू केले. यामुळे अनेक किरकोळ, होलसेल व्यापारी नाराज झाले. मागील लॉकडाउनच्या मोठ्या कालावधीत गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, लग्नसराई, रमजान ईद व इतर महत्त्वाचे सण वाया गेले. यास सर्वांनी आपापल्या परीने शासनाला सहकार्यच केले होते.
आता प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठा पूर्णवेळ म्हणजे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. कारण, जीवनावश्यक वस्तूची व इतर वस्तूंची खरेदी एकाच दिवशी करता येईल व ग्राहकाला पुन्हा-पुन्हा मार्केटमध्ये ये-जा करण्याची गरज भासणार नाही. तसेच व्यापाऱ्यांमधील अंतर्गत स्पर्धेमुळे एकमेकांचे नियमित ग्राहक हे दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जात असल्याने त्यांच्याकडील आधीची व्यापारी उधारी व देणी थकीत होण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकरिता बाजारपेठेत गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने सर्व बाजारपेठा खुल्या केल्याने ग्राहकांना अनेक पर्याय व वस्तू किफायतशीर दरात व एकाचवेळी खरेदीची संधी मिळून व्यापारी बांधवांचेही नेहमीचे संबंधित ग्राहक कायम राहतील. याचबरोबर बाजारपेठेतील उलाढाल वाढून शासनाच्या महसुली उत्पन्नात वाढ होईल व अर्थकारण त्वरित सुरळीत होण्यास मदत होईल. यामुळे रोजगारातसुद्धा वाढ होईल व व्यापारवृद्धीमुळे आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल. शिवाय कोरोनाच्या उपचारासाठी व लागणाऱ्या आरोग्याच्या खर्चासाठी
आर्थिकदृष्ट्या सक्षम असणेही तेवढेच गरजेचे आहे, हे वास्तव आहे.
या बाबींचा धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे
"चेंबर'चे अध्यक्ष राजू राठी म्हणाले, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने सर्व संलग्न सभासद संघटना व व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करून राज्य शासन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नियोजन भवनात समक्ष भेटून निवेदन दिले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सर्व संबंधित खातेप्रमुख व स्थानिक प्रशासनास प्रत्यक्ष भेटून व ई-मेलद्वारे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.