मदतीसाठी सरसावले अनेक हात 

मदतीसाठी सरसावले अनेक हात 
Updated on

सोलापूर : कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्‍यातील डोणगावसारख्या ग्रामीण भागात या गंभीर आजाराविषयी ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती सुरू आहे. तसेच गावातील शिवपार्वती महिला बचत गटातील महिलांचे कॉटन मास्क तयार करण्यासाठी हात सरसावले आहेत. 
हेही वाचा ः लोकांना जीवाचं पडलंय आणि मोदींना प्रचाराच...

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांच्या हातचे काम गेले आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, या परिस्थितीतही महिला बचत गट पुढे सरसावले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्‍यातील डोणगाव गावातील शिवपार्वती महिला बचत गटाची स्थापना 2016 ला झाली. या बचत गटात 10 महिला सदस्या आहेत. या महिला एकत्र येऊन कॉटन मास्क तयार करत आहेत. हा बचत गट गेल्या चार वर्षांपासून अनेक कामे करत आहेत. त्यात सेंद्रिय शेती, व्यावसायिक महिला घडविणे, महिला सक्षमीकरण, आरोग्य, स्वच्छता अशा अनेक गोष्टींवर या गटाचे काम सुरू आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावाबरोबरच इतर 15 गावांतूनही ट्रेनर म्हणून 600 महिलांबरोबर मास्क बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन मास्क तयार करत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून अत्यावश्‍यक सेवा पुरविल्या जात आहे. 

मास्क तयार करण्यात राणी दगडे, सविता साळुंखे, उज्ज्वला मेटे, वनिता मेटे, सुनीता मेटे, ज्योती मेटे, चलन जगदाळे, प्रभावती जगदाळे, लक्ष्मी मेटे, जिजाबाई मेटे यांचा सहभाग आहे. 


माझ्या बचत गटातील महिला या अनेक व्यवसाय करतात. स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेअंतर्गत "वेल नेटवर्क'मधून व्यावसायिक महिला घडविण्याचे काम सुरू आहे. सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यामुळे ही बिकट परिस्थिती पाहता गटातील महिला न डगमगता कॉटन मास्क शिवून देत आहेत. यंदा बचत गटामार्फत मास्क बनवण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. 
- सावित्रा पाटील, अध्यक्षा, शिवपार्वती महिला बचत गट 

आई प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप 
देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने रोजंदारी कामगार व कारागीर घरी बसून असल्याने दैनंदिन जीवन ठप्प झाले आहे. याचेच सामाजिक भान ठेवून आई प्रतिष्ठान सोलापूर यांच्याकडून 300 कुटुंबांना दैनंदिन जीवनाश्‍यक वस्तू साखर, गहू, तांदूळ, तेल, चहा आदी वाटप करण्यात आले. यावेळी आई प्रतिष्ठानचे मोहन डांगरे यांच्यासह डांगरे परिवारातील सदस्य व हिरेमठ परिवार उपस्थित होते. 

"सिंहराज', चव्हाण यांच्यातर्फे 
डॉक्‍टरांना मास्कचे वाटप 

सध्या जगभरात पसरत असलेल्या कोरोना विषाणू पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात अत्यंत दक्षता बाळगत आहेत. कोरोना संसर्गित रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी डॉक्‍टर व आरोग्य कर्मचारी दिवसरात्र सेवा देत आहेत. डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून येथील सिंहराज ऍडव्हर्टायझिंग व गुरुदत्तप्रभू चव्हाण यांच्या वतीने डॉ. वैशंपायन शासकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कॉटन मास्कचे वाटप करण्यात आले. सुमारे 500 मास्क अधिष्ठाता कार्यालयात डॉ. विनायक डोईजोडे, प्रशासकीय अधिकारी समाधान जामकर यांच्याकडे गुरुदत्तप्रभू चव्हाण व संजय दास व कल्याण लाळे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. 

"एनटीपीसी'च्यावतीने 
कामगारांना रेशन वाटप 

कोरोना विषाणूच्या महामारीच्या कठीण काळात कामगारांना मदत करण्यासाठी एनटीपीसी-सोलापूर पुढे आली आहे. एनटीपीसी-सोलापूरकडून जिल्हा प्रशासनासमवेत लॉकडाउनमुळे ज्यांच्याकडे अन्नधान्य नाही, अशा 80 कामगारांना एनटीपीसी- सोलापूरचे मुख्य महाव्यवस्थापक एस. गौरी शंकर व भूसंपादन विभागचे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या हस्ते रेशन सामग्रीचे वाटप केले. यावेळी महाव्यवस्थापक रजत चौधरी, अतिरिक्त महाव्यवस्थापक जॉन मथाई, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. 
याआधीही एनटीपीसी-सोलापूरने जिल्हा प्रशासनाच्या सांगण्यानुसार सोलापूरहून कर्नाटकला स्थलांतरित होणाऱ्या 100 मजुरांना धान्याची पाकिटे वितरित केली आहेत. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एनटीपीसी-सोलापूरच्या सृजना महिला मंडळाच्या वतीने होटगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मास्क, सॅनिटायझर्स, हॅंडग्लोव्हज, साबण इत्याची वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला आहे. 
महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.