'कोरोना'बद्दल अफवा पसरविणाऱ्यावर सायबर वॉच

 The cyber watch that sparked the rumor from 'Corona'
The cyber watch that sparked the rumor from 'Corona'
Updated on

सोलापूर : कोरोना या विषाणूजन्य आजाराबद्दल सोशल मिडियातून अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर सेलतर्फे वॉच ठेवला जात आहे. चिकन खावू नका, चिकन खालल्याने कोरोना होतो, असा मेसेज सोशल मिडियात टाकणाऱ्या पुण्यातील एका तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्या मेसेजवर विश्‍वास ठेवावा अथवा ठेवू नये, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्याची माहिती सायबर सेलचे पोलिस अधिक्षक बालसिंग रजपूत यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 
 
जम्मू- काश्‍मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर राज्याच्या सायबर सेलने अनेकांवर गुन्हे दाचखल केले होते. तर सोशल मिडियातील अनेकांच्या आक्षेपार्ह पोस्ट डिलिटही केल्या होत्या. आता त्याच धर्तीवर 'कोरोना'बद्दल अफवा पसरवून लोकांमध्ये भिती निर्माण करणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष केंद्रीत केले आहे. सोशल मिडियावरील मेसेजवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस मुख्यालयातील सायबर सेलला गृह विभागाने सक्‍त सूचना केल्या आहेत. त्यानुसार त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून सोशल मिडियातील अशा मेसेजवर वॉच ठेवला जात असल्याचेही श्री. रजपूत यांनी सांगितले. 

अफवा पसरविणारे मेसेज शोधण्याचे काम सुरू
कोरोना या विषाणूजन्य आजाराबद्दल सोशल मिडियातून अफवा पसरविणाऱ्यांवर कलम 505 आणि 269, 270 अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. पशु विभागातर्फे पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. आता सोशल मिडियातील अफवा पसरविणारे मेसेज शोधून डिलिट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. 
- बालसिंग रजपूत, अधीक्षक, सायबर सेल, मुंबई 

सायबर सेलचे जिल्हानिहाय नियोजन 
- सायबर सेलकडून सोशल मिडियातील कोरोनाबद्दलच्या मेसेजची नियमित पडताळणी 
- चिकन खालल्याने कोरोना होतो, असा मेसेज सोशल मिडियातून टाकणाऱ्याविरुध्द पहिला गुन्हा 
- राज्याच्या सायबर सेलकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी 
- सोशल मिडियातील कोणत्या मेसेजवर विश्‍वास ठेवावा, याचे सायबरकडून स्पष्टीकरण 
- प्रत्येक पोलिस मुख्यालयातील सायबर सेलमध्ये स्वतंत्र कर्मचारी नियुक्‍त 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.