परीक्षा विभागातील गैरप्रकाराची चौकशी लांबणीवर...का ते नक्‍की वाचा 

solapur-univarsity-solapur
solapur-univarsity-solapur
Updated on

सोलापूर : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या नावे परस्पर लॉगिन आयडी तयार करण्यात आला. त्याद्वारे फार्मसीच्या 11 विद्यार्थ्यांचे गुण वाढवून नापास विद्यार्थ्यांना पास केल्याचा प्रकार सोलापूर विद्यापीठात समोर आला. त्यामध्ये कुलगुरुंवर थेट आरोप झाल्याने त्यांनी सायबर चौकशीचा निर्णय घेतला. त्यानुसार सायबर सेलने परीक्षा विभागाकडे सर्व्हरची मागणी केली. मात्र, परीक्षांच्या निकालाचे कारण पुढे करुन सर्व्हर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे डाटा लॉक होण्याची भिती निर्माण झाल्याचे 'सायबर' पोलिसांनी सांगितले. 


पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अर्चना चोपडे यांनी स्वत:च्या मुलाच्या उत्तरपत्रिकांवर खाडाखोड करुन त्याला उत्तीर्ण केले. या प्रकरणात त्यांना बडतर्फ करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच थेट कुलगुरुंच्या परस्पर त्यांच्या नावे लॉगिन आयडी तयार करुन नापास विद्यार्थ्यांना पास केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर प्राचार्य संघटना, सुटा संघटना, मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेकडून कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार कुलगुरु डॉ. फडणवीस यांना क्‍लिन चिट मिळाली. मात्र, यामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे गुण चुकीच्या पध्दतीने वाढवून पास केल्याचे समोर आले. त्यानंतर कुलगुरुंनी पोलिसांत गुन्हा नोंदवून गुन्ह्याचा तपास सायबरकडे वर्ग केला. सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठातील परीक्षा विभागाची पाहणी केली. त्यानुसार वस्तुनिष्ठ चौकशीसाठी परीक्षा विभागाचा सर्व्हर तत्काळ ताब्यात मिळावा, अशी मागणी केली. परंतु, निकालाचे कारण देत विद्यापीठाने त्यासाठी मुदतवाढ मागितली. आता महिना होऊनही सर्व्हर मिळाला नसल्याने चौकशीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 
 

विद्यापीठाला देणार पत्र 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या गैरप्रकाराचा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला असून आम्ही विद्यापीठाकडे सर्व्हरची मागणी केली आहे. एक महिना झाला परंतु, निकालाचे कारण सांगत अद्याप सर्व्हर मिळालेला नाही. ज्यादा वेळ केल्यास नेट कनेक्‍टिव्हिटीमुळे डाटा लॉक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता विद्यापीठाला पत्र दिले जाईल. 
- अमोल कानडे, सायबरतज्ज्ञ, पोलिस आयुक्‍तालय, सोलापूर 


ठळक बाबी... 

  • परीक्षा विभागातील गुन्ह्यांच्या तपासासाठी पुण्यातील सायबर लॅबची निवड 
  • चौकशीसाठी सर्व्हरची मागणी करुन महिना झाला तरीही विद्यापीठाकडून मिळेना सर्व्हर 
  • सर्व्हरला नेट कनेक्‍टिव्हिटी असून विलंबामुळे डाटा लॉक होण्याची शक्‍यता 
  • सर्व्हर मागणीसाठी सायबरचे लेखी पत्र : दिरंगाई होत असल्याने वस्तुनिष्ठ चौकशीवर प्रश्‍नचिन्ह 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()