सोलापूर : एखादी आपत्ती जरी आली तरी त्यावर कोणकोणते विनोद होऊ शकतात हे सध्या समाजमाध्यमांवर दिसू लागले आहे. कोरोनामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असली तरी हे विनोद वाचल्यावर वाचणारा हसल्याशिवाय रहात नाही. असेच अनेक विनोद सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्यामुळे चांगलीच करमणूक होत आहे.
हेही वाचा - अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली नगरसेविकांची सहल
कोरोना उष्णतेत टिकू शकत नाही असा दावा केला जात असल्याने कायम उष्णतेत अग्रभागी असलेल्या सोलापूरला भलतेच महत्त्व आले आहे. येथील उष्णतेवर आधारीत अनेक चारोळ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करणारे पर्यटक आता निश्चितच सोलापूर दौऱ्याचे नियोजन करतील अशा उपरोधिक चाराेळ्या तयार झाल्याअसून त्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या काही निवडक चारोळ्या....
" मलेरिया " के मच्छर ने अपने बेटे से कहा.....Corona का कोर्स कर पगले, उसमें करियर है .....!
पूर्वी शिंक आली की म्हणायचे सत्य आहे... आता आली की लगेच म्हणतात उठ इथून....
NTPC चा उपयोग झाला शेवटी!! कोरोना व्हायरस उष्ण ठिकाणी राहत नाही. आता लोक थंड ठिकाणी जसे कुल्लू ,मनाली ,या ठिकाणी
जाण्या ऐवजी सोलापूरला फिरायला येणार
पुण्यात,मुंबईत राहणाऱ्या लोकांनी आवंदा जत्रा यात्रा ,उन्हाळ सुट्टीला गावाकडं यायची तसदी घेऊ नये , वाटल्यास जवारी डाळी पोच केल्या जातील पण हिकडं फिरकू नका , गावाकडची समदी खुशाल हायती काळजी करू नये
आज N95 मास्क आणला, त्या वर बघतो तर 'Made in China'
म्हणजे अंधाराची भीती वाटतें म्हणून भुताचा हात धरून चालण्या सारखे आहे
जर तुम्हाला नॉर्मल कफ,सर्दी, खोकला झाला असेल...
तर जिवंत राहण्यासाठी भारतीय न्यूज चॅनेल पाहू नका...
नाहीतर भिती मुळे ही मरू शकता...
अब ये अफवाह कौन फैला रहा है ये जो कॉलर ट्यून पर खाँसने की
आवाज है वो दिल्ली के सीएम की है !
कोरोना इफ़ेक्ट ...वधु अपेक्षा
२०२० मधे मोठे बदल! मुलगा भारतातच नोकरी करणारा असावा. चीन, इटली,अमेरिका, दुबई, ईरान, रशिया इ. कोरोना बाधित देशांतील नसावा.
भारतात सुद्धा दिल्ली, पुणे, बंगलोर, मुंबई, जयपुर सारख्या महानगरातील नसावा. सोलापूर मुलांना विशेष प्राधान्य!!!
मेडीकल दुकानदार बेशुद्ध पडला.. जेंव्हा एक महिला त्यास म्हणाली.... माझ्या साडीला मॅचिंग होईल असा अॅंटी कोरोना मास्क द्य़ा भाऊ....
चीनवाले कोरोना व्हायरससे परेशान है अैार हम यहाॅं कोरोना के कॅालर ट्यनसे....
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.