कलमाडी अन्‌ पवारांचे पुणे आता भाजपचे झाले 

chandrakantdada patil
chandrakantdada patil
Updated on

सोलापूर : प्रत्येक शहराचा एक वेगळा रंग असतो. सोलापूर आणि पुण्याचा रंग हा भगवा आहे. या ठिकाणी कोणी कितीही प्रयत्न केले तरीही भाजप पराभूत होऊ शकत नाही. पुणे पूर्वी सुरेश कलमाडी यांचे होते. त्यानंतर ते अजित पवार यांच्याकडे आले. अजित पवारांकडून पुणे आता भाजपकडे आले आहे. पुण्यात भाजपचे 98 नगरसेवक आहेत. पुणे ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा प्रयत्न करू लागले आहेत. परंतु पुणे अन्‌ सोलापूर हे भाजपकडेच राहणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. 
हेही वाचा - दोन बसची समोरासमोर धडक सोलापूर जिल्ह्यात एक बस उलटली 
सोलापूर शहर भाजपचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज सोलापुरातील शांतिसागर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष निवडीचे निवडणूक अधिकारी नितीन काळे, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, पांडुरंग दिड्डी, महापालिका सभागृह नेते श्रीनिवास करली, शशी थोरात आदी उपस्थित होते. 
हेही वाचा -चार वर्षानंतर शेतकऱ्यांना मिळाली गुड न्यूज 
तुम्ही पाच हजार वर्षांपासूनचा इतिहास काढून बघा. तुम्हाला मतभेद आढळतील. मतभेद असणे हे जिवंत माणसाचे लक्षण आहे. सोलापूर शहरातील भाजप चांगली कामगिरी करत आहे परंतु गटबाजीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यानंतर बायको किंवा नवरा वर्तमानपत्राकडे बातमी व फोटो घेऊन जात नाही, मग शहर भाजपातील गटबाजीची, मतभेदाची चर्चा होते. मतभेद असावेत पण जगजाहीर नसावेत असाच सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिला. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, हा त्याच्याशी बोलत नाही. हा त्याच्या घरी जात नाही. त्याला याच्या घरचा चहा कडू लागतो असे वागणे बरोबर नसल्याचे सांगत सोलापुरातील आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह इतरांच्या गटबाजीवर बोट ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.