दुबईहून आलेल्या एकास सोलापूरला रुग्णालयात हलवले

One from come to Dubai was shifted to Solapur Hospital
One from come to Dubai was shifted to Solapur Hospital
Updated on

मोहोळ (जि. सोलापूर) ः वडाचीवाडी (ता. मोहोळ) येथे दुबईहून आलेल्या एका 25 वर्षीय संशयिताला कोरोनासदृश आजाराची लक्षणे आढळून आल्याने अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने त्याला अधिकृत तपासणीसाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. अधिकृत तपासणीनंतरच खरी वस्तुस्थिती समजणार आहे. दरम्यान, संपूर्ण वडाचीवाडी गावचा आम्ही सर्व्हे करणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कादे यांनी दिली. 

वडाचीवाडी (ता. मोहोळ) येथील रहिवासी असलेला संशयित 3 मार्च रोजी दुबईहून पुणे विमानतळावर उतरला. दुबईवरून आल्याने त्याची विमानतळावर तपासणी झाली. 4 मार्च रोजी सायंकाळी तो वडाचीवाडी येथे आला. मात्र, 11 एप्रिल रोजी त्याला सर्दी-पडसे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे तो खासगी दवाखान्यात गेला. त्या ठिकाणी तपासणी केल्यावर संबंधित डॉक्‍टरने त्याला अधिकृत तपासण्या करण्यासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तोपर्यंत त्याला असलेला ताप, सर्दी, घसा खवखवणे हा त्रास कमी व्हावा म्हणून गोळ्या दिल्या. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित डॉक्‍टरने हा प्रकार अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला कळविला. दरम्यान, गुरुवारी (ता. 12) अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. सुहास कादे, आर. बी. कांबळे, बी. एम. सातपुते, आर. आर. रेड्डी, एम. पी. सुरवसे यांचे पथक वडाचीवाडी येथे दाखल झाले. संशयिताची तपासणी करून त्याच्या संपर्कात कोण कोण आले आहे याची चौकशी केली. अधिकृत तपासणीसाठी त्याला आम्ही सोलापूरला घेऊन जात असल्याचे सांगितले. तसेच, त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मास्क देण्यात आले आहेत. 


शाळेत येणारे विद्यार्थी थांबविले 
वडाचीवाडी येथून दररोज 25 ते 30 विद्यार्थी देवडी येथील जिल्हा परिषद शाळेत स्कूल व्हॅनमधून शाळेला येतात, इतर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ नये व खबरदारीचा उपाय म्हणून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन-तीन दिवस शाळेत न येण्याचा सल्ला दिला असल्याचे देवडी शाळेचे शिक्षक अंकुश ठाकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.