194 किलोच्या रुग्णावर लठ्ठपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

 Successful surgery for obesity on a 194 kg patient
Successful surgery for obesity on a 194 kg patient
Updated on

सोलापूर : सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात 194 किलो वजनाच्या रुग्णावर लठ्ठपणाची (बिरीयाट्रीक) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील पहिली शस्त्रक्रिया असल्याचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले. 

सर्वोपचार रुग्णालयात प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये जुलै 2019 पासून आतापर्यंत 950 रुग्णांनी उपचार घेतले आहेत. तर 90 ते 140 किलोपर्यंत वजन असलेल्या नऊ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, सोलापुरातील एका सुखवस्तू कुटुंबातील तरुण महाविद्यालयीन शिक्षणानंतर वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत आहे. मागील सात वर्षांत त्याचे वजन तब्बल 194 किलोपर्यंत पोहचले आणि त्याला विविध त्रास जाणवू लागले. त्यानंतर त्याने डॉ. ठाकूर यांची भेट घेतली आणि शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निश्‍चय केला. त्यानुसार 6 मार्च रोजी त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात डॉ. ठाकूर यांनी डॉ. ए. एन. मस्के, डॉ. प्रदीप कसबे, डॉ. रवी कंदलगावकर, डॉ. प्रेरणा मुकासदार, डॉ. अभिलाश पवार, डॉ. संदीप दडमल यांच्या मदतीने बिरीयाट्रीक सर्जरी यशस्वी केली. तत्पूर्वी, डॉक्‍टरांनी त्याला दिलेला डायट प्लॅन काटेकोर पाळला आणि दिड महिन्यांत त्याचे तब्बल 20 किलो वजन कमी झाल्याचा अनुभवही या वेळी सांगण्यात आला. 
 
मे-जूनमध्ये सुरु होणार लेझर शस्त्रक्रिया 
लठ्ठपणावरील डायट प्लॅन हा खूप महागडा असल्याने तो मध्यम व सर्वसामान्यांना परवडत नाही. सोलापुरातील 30 टक्‍के नागरिकांना लठ्ठपणाचा त्रास असून त्यामध्ये विशेषत: महिलांचे प्रमाण खूप आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेची सोय करण्यात आली असून त्यासाठी शासनाकडे रोबोटची मागणीही केली आहे. तत्पूर्वी, मे-जूनमध्ये याठिकाणी लेझर उपचारपध्दती सुरु केली जाणार असल्याचेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.