सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी ऊर्फ नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ यांनी सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दिलेले पुरावे (तलमोड, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथील मोडी लिपीतील फसली उतारे संशयास्पद असल्याचा अहवाल दक्षता पथकाने दिला आहे. 1344 व 1347 सालातील मोडी भाषेतील जमीन कसत असलेले व त्यावर जातीचा उल्लेख असलेले पुरावे संशयास्पद असून तलमोड गावातील बापू यमाजी पाटील यांच्या शेतातील जो पुरावा दिला आहे. तो व्यक्तीच त्या गावात नसल्याचेही निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
हेही वाचा - ब्रेकिंग : देवदर्शनाला जात असताना वेळापूर जवळ अपघात; पाच ठार
दक्षता पथकाचे पोलिस निरीक्षक एम. के. नाईकवाडे यांनी हा अहवाल समितीसमोर सादर केला आहे. या अहवालावरून खासदार महास्वामींना आज पुन्हा नोटीस बजावण्यात आली असून या अहवालावर 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांना म्हणणेच सादर करावे लागणार आहे. या प्रकरणावर आता 15 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. खासदारांनी दिलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथक 29 जानेवारीला उमरगा तहसील कार्यालय येथे गेले होते. त्यावेळी तहसीलदार संजय पवार हे बाहेरगावी गेले होते नायब तहसीलदार डॉ. रोहन काळे हे देखील व्हिजीटसाठी साठी बाहेर गेले होते. अभिलेख कक्षात अभिलेखापाल एस. एस. अहंकारी यांच्यासोबत हे पथक 30 जानेवारीला पुन्हा उमरगा तहसील कार्यालयात गेले. त्यावेळी देखील तहसीलदार संजय पवार हे औरंगाबादला न्यायालयीन कामकाजासाठी गेल्याचे या पथकाला समजले.
हेही वाचा - दैव बलवत्तर म्हणून पाच वर्षांची सई सुखरूप
पथकाने तहसील कार्यालयातील रजिस्टरची पडताळणी केली असता च्या नोंदीचा कागद खासदार महास्वामींनी दिली आहे ते पान वगळता संपूर्ण रजिस्टरमधील नोंदी फिक्कट दिसत होत्या. हे पान नंतर चिटकवलेले दिसून आल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. बापू यमाजी पाटील यांच्या शेतात गुरुबसय्या नूरंदय्या हिरेमठ बेडा जंगम हे जमीन कसत असल्याची नोंद आढळून आली. बाकीच्या उर्वरित पूर्ण रजिस्टर नोंदीमध्ये फक्त कसणाऱ्याचे नाव आहे त्यांच्या जातीचा उल्लेख कुठेही आढळून आला नसल्याचेही मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.