सोलापूर : महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर किमान सहा महिन्यांत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, असे अपेक्षित आहे. मात्र, वर्षे संपत आले तरीही पाच लाख 95 हजार विद्यार्थ्यांपैकी तीन लाख 25 हजार 241 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रकमेचा दमडाही मिळालेला नाही. दुसरीकडे महाविद्यालये आणि जिल्हा समाजकल्याण कार्यालयकडून 45 हजार 661 विद्यार्थ्यांच्या अर्जांची माहिती शासनाला सादर केलीच नसल्याचे समोर आले आहे.
हेही नक्की वाचा : तो म्हणाला प्रेम करतेस की नाही अन्...
केंद्र सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व राज्य शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रतीपूर्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्चएण्डपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी विधिमंडळात दिले. मात्र, मागील 11 महिन्यांत त्यापैकी एक लाख 46 हजार 193 विद्यार्थ्यांना 208 कोटी 46 लाखांची शिष्यवृत्ती मिळाली असून उर्वरित विद्यार्थ्यांची रक्कम प्रलंबितच आहे. नागपूर विभागातील 89 हजार 803 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले असून त्यापैकी 12 हजार 989 विद्यार्थ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर नाशिक विभागातील 59 हजार 599 विद्यार्थ्यांपैकी नऊ हजार 316 तर पुणे विभागातील 93 हजार 315 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 113 विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द ठरविले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 10 हजार विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे समाजकल्याण आयुक्तालयाने स्पष्ट केले. तसेच भंडाऱ्यातील तेराशे, चंद्रपूर येथील दोन हजार, गडचिरोलीतील आठशे, गोंदियातील साडेआठशे, नागपूर येथील सहा हजार 693, वर्ध्यातील चौदाशे, नगर येथील दोन हजार 872, धुळ्यातील साडेपाचशे, जळगाव येथील साडेअकराशे, नंदूरबारातील पावणेचारशे, नाशिक येथील चार हजार 380, कोल्हापुरातील दोन हजार 121, सांगली व साताऱ्यातील प्रत्येकी अकराशे आणि सोलापुरातील एक हजार 885 अर्ज नामंजूर झाले आहेत.
हेही नक्की वाचा : खासदार डॉ. महास्वामी यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी निर्णय
शिष्यवृत्तीची सद्यस्थिती
एकूण अर्ज
4,71,434
नामंजूर अर्ज
72,290
शिष्यवृत्ती वितरीत
208.46 कोटी
शिष्यवृत्ती न मिळालेले विद्यार्थी
3,25,241
प्रलंबित रक्कम
863.22 कोटी
हेही नक्की वाचा : महिलांना सुवर्णसंधी ! गावगाड्याच्या सिंहासनावर 'ती'ला संधी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.