आईनेच केला मुलाचा खून; प्रियकराची घेतली मदत

वडिलांच्या फिर्यादीनुसार आष्टा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

वडिलांच्या फिर्यादीनुसार आष्टा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

वाळवा : साडेतीन वर्षाच्या निष्पाप बालकाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आईसह तिच्या प्रियकराविरुद्ध आष्टा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला. (Crime news) मनन सुशांत वाजे (वय साडेतीन वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील सुशांत सुधीर वाजे (माळभाग, वाळवा) यांनी पोलिसात (Police Action) तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सौ. प्राची सुशांत वाजे, तिचा प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील (मूळ शिराळा सध्या दोघेही परळ, मुंबई) यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात मननचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर संशयित प्राची व अमरसिंह यांनी त्याच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. (Sangli News) श्री. वाजे यांनी दिलेली फिर्याद व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सौ. प्राची वाजे ही गेल्या २७ जूनला घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडली. सोबत तिने साडेतीन वर्षाचा मुलगा मननलाही नेले.

Crime News
अनिल देशमुख प्रकरणात पुण्यातील मोठा अधिकारी ईडीच्या रडारवर

नऊ नोव्हेंबरला वाजे यांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार आष्टा पोलिसात दिली. त्या दरम्यान वाजे यांच्या मित्रांना एक व्हिडिओ मिळाला होता. त्यात प्राची व अज्ञात इसम मननला मारहाण करीत असल्याचे चित्रण होते. त्या अनुषंगाने वाजे त्यांनी शोध घेतला. पण मनन व प्राचीचा शोध लागला नाही. गेल्या सात नोव्हेंबरला एका बालकाच्या मृतदेहावर शिराळा तालुक्यातील वाकुर्डे येथे गुपचूप अंत्यसंस्कार झाले. बिळाशी येथील ग्रामपंचायतीत मनन सुशांत वाजे नावाने मृत्यू नोंदीसाठी अर्ज दाखल झाल्याची माहिती सुशांत वाजे यांना मिळाली. त्याची माहिती घेतल्यानंतर वाजे यांना घटनेची खात्री झाली. त्यानुसार त्यांनी आष्टा पोलिसात पत्नी सौ. प्राची व अमरसिंह विश्वासराव पाटील यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.

अमरसिंह हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता व शिराळा पंचायत समितीचा सदस्यही आहे. सौ. प्राची व अमरसिंह पाटील यांनी प्रेम प्रकरणात अडथळा ठरतोय म्हणून मननचा मुंबईत खून केला. मृतदेह दोन दिवस चारचाकीत लपवून ठेवला. नंतर गुपचूपपणे विल्हेवाट लावली. सुशांत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सौ. प्राची वाजे, तिचा प्रियकर अमरसिंह पाटील यांच्या विरोधात कलम ३०२, ३०१, ३६६, ४९८, १७७, ३४ आणि बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोज सुतार तपास करीत आहेत.

Crime News
पंतप्रधान मोदींचा भूतानच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.