Tembhu Yojana : तब्बल एक हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार; आमदार विश्वजित कदमांनी दिली महत्त्वाची अपडेट

‘टेंभू’च्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यासाठीही सर्वेक्षण झाले आहे.
MLA Vishwajeet Kadam
MLA Vishwajeet Kadamesakal
Updated on
Summary

या क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना करणे व वितरण व्यवस्था करणे यासाठी ७१.२८ कोटी असा खर्च अपेक्षित आहे.

कडेगाव : तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव, शाळगाव, तसेच कऱ्हाड तालुक्यातील शामगाव, पाचुंद येथील टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रानजीक असलेली, परंतु उंचावरील व पाण्यापासून वंचित असलेली १ हजार ५०० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी ‘टेंभू’च्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यासाठीही सर्वेक्षण झाले आहे. याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून (Water Resources Department) प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहोत, अशी माहिती आमदार विश्वजित कदम (MLA Vishwajeet Kadam) यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

आमदार कदम म्हणाले, वरील गावांमधील उंचावर असलेल्या १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रास या योजनेचा लाभ होत नसल्याने पाण्यापासून वंचित शेतजमीन सिंचनाखाली येण्यासाठी व टेंभू योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यासाठी सातत्याने  शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. टेंभू योजनेपासून (Tembhu Yojana) वंचित असलेल्या या १ हजार ५०० हेक्टर  क्षेत्रास पाणी द्यावयाचे झाल्यास टप्पा क्र. २ प्रमाणे शिवाजीनगर (ता. कडेगाव) तलावामध्ये सोडून, तेथून १४५ मीटर उचलून स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे या गावांमधील संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

MLA Vishwajeet Kadam
Bidri Sugar Factory : बिद्री साखर कारखान्याचा डिस्टिलरी परवाना निलंबित; राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तांची मोठी कारवाई

याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी स्वतः  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता  हणमंत गुणाले, टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन वंचित लाभक्षेत्राला पाणी देण्याबाबत संबंधित प्रस्ताव तत्काळ सादर करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. या क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना करणे व वितरण व्यवस्था करणे यासाठी ७१.२८ कोटी असा खर्च अपेक्षित असून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्यामार्फत १२ फेब्रुवारी २०२४ च्या पत्रान्वये मंजुरीसाठी शासनास सादर करण्यात आलेला आहे.

MLA Vishwajeet Kadam
15 वर्षे आमदार, 8 वर्षे मंत्री असणाऱ्यांना काळे झेंडे दाखवले का? 'हद्दवाढ'प्रश्‍नी शौमिका महाडिकांचा आरोप

कडेगाव तलावासाठी स्वतंत्र वाहिनीने पाणी

‘जिल्हा  नियोजन’च्या शनिवारी (ता. २२) झालेल्या बैठकीत कडेगाव तलावाकरिता स्वतंत्र जलवाहिनी करून कायमस्वरुपी पाणी देण्याची व्यवस्था करण्याबाबत आग्रही मागणी केली. त्यास अनुसरून जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही होईल, असे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com