पाऊसमानाचा इतिहास सांगतो, की महाराष्ट्रातून म्हणजे राजापूर बंधाऱ्यातून प्रतिवर्षी ३१ ऑगस्टपर्यंत ७००, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत ३०० टीएमसी पाणी वाहून जाते.
सांगली : कर्नाटकमधील आलमट्टी धरणात (Almatti Dam) काल सकाळी आठपर्यंतचा पाणीसाठा ९७.४२ टीएमसी झाला आहे. पाण्याची आवक ४३ हजार ५७८ क्युसेक आहे. केंद्रीय जल आयोगाने (Central Water Commission) ऑक्टोबर २०१८ मध्ये निश्चित केलेल्या धरण पाणीसाठ्याच्या वेळापत्रकाचे कर्नाटक शासनाने उल्लंघन केले आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार पाणी पातळी ५१३.६० मीटर इतकीच हवी, जी सध्या ५१७.९८७ मीटर आहे. ३१ जुलैअखेर क्षमतेच्या पन्नास म्हणजे सुमारे ६२ टीएमसीइतकाच पाणीसाठा असायला हवा. हव्यासापोटी सध्या धरण जवळपास ८० टक्के भरूनही टाकले आहे. हिप्परगी बॅरेजमध्येही (Hippargi Dam) अडीच टीएमसी पाणी साठवले आहे. आजपासून (ता. २०) कृष्णा पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज असताना केलेली ही घाई सांगली-कोल्हापूर जिल्ह्यासाठी धोका ठरण्याचीच शक्यता आहे.
पाऊसमानाचा इतिहास सांगतो, की महाराष्ट्रातून म्हणजे राजापूर बंधाऱ्यातून प्रतिवर्षी ३१ ऑगस्टपर्यंत ७००, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत ३०० टीएमसी पाणी वाहून जाते. आतापर्यंत राजापूर बंधाऱ्यातून सुमारे १६० टीएमसी विसर्ग झाला असावा. त्यातले जवळपास शंभर टीएमसी पाणी कर्नाटकने आताच अडवून ठेवले आहे. त्याचा परिणाम सध्या शिरोळ तालुक्यात दिसत आहे. आज राजापूर बंधाऱ्यावर १२ फूट पाणी आहे. त्या बॅकवॉटरची फूग कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, तेरवाड, इचलकरंजी, रुई बंधाऱ्यांपर्यंत दिसत आहे. या भागात सध्या पाणी स्थिर किंवा मंद गतीने पुढे सरकते आहे.
सांगली जिल्ह्यातही अंकली-हरिपूर पुलापर्यंत पाण्याची ही फूग दिसत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ऐनवेळी आलमट्टीतून विसर्ग वाढवणे अवघड होऊ शकते. तेव्हा, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय जल आयोगाच्या धरण वेळापत्रकाच्या अंमलबजावणीसाठी कर्नाटकवर आग्रहपूर्वक दबाव आणला पाहिजे, अशी महापूर नियंत्रण कृती समितीची सातत्याने मागणी आहे. त्यासाठी आता जलबुडी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
कोयना व वारणा धरणात सध्याचा पाणीसाठा अनुक्रमे ४७.४१, २२.३६ टीएमसी आहे, जो केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार योग्य आहे. नियमावलीचे असे पालन हिप्परगी बॅरेज आणि आलमट्टी धरणाबाबत दिसत नाही. २१ मे रोजी दोन्ही राज्यांच्या सचिवस्तरीय बैठकीत दोन्हीकडील अधिकाऱ्यांनी नियमावलीच्या पालनास मान्यता दिली होती. सांगली, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कर्नाटकच्या सचिवांशी संपर्क साधून धोक्याची जाणीव करून दिली पाहिजे. पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत.
-प्रभाकर केंगार, विजयकुमार दिवाण निवृत्त अभियंता, जलसंपदा विभाग
९ जुलै आलमट्टी ५१५.८५ व ७१.३९ ७८६६८ व ५०
हिप्परगी ५२०.३५ व २.३६ ६२००० व ७११२०
१० जुलै
आलमट्टी ५६.५१ व ७८.६१ ८४६४५ व ५०
हिप्परगी ५२०.१० व २.२६ ६४७२८ व ६५१३५
११ जुलै
आलमट्टी ५१७.१ व ६६.९६ ६९९४२ व ५०
हिप्पररगी ५२०.१५ व २.४२ ५१५१० व ४८९०८
१२ जुलै
आलमट्टी ५१७.२२ व ८७.२२ ७३८७४ व ३५००
हिप्परगी ५२०.९० व २.८४ ३०८७३ व ७५४६०
१३ जुलै आलमट्टी ५१७.३४ व ८८.६३ १९११९ व ३५००
हिप्परगी ५२१.५० व ३.०६ २१८०० व १५४९५
१४ जुलै आलमट्टी ५१७.४६ व ९०.३३ २३६७८ व ३५००
हिप्परगी ५२१.५० व ३.०६ १८४८० व १७७३०
१५ जुलै
अलमट्टी ५१७.५६ व ९१.६६ २५१२३ व १५०००
हिप्परगी ५२१.५० व ३.०६ २०७९० व २००४०
१६ जुलै आलमट्टी ५१७.८४ व ९५.४७ ६६६८३ व २००००
हिप्परगी ७५४६० व ४८८१० २८२७९ व ७६९८८
१७ जुलै आलमट्टी ५१८.६० व ९८.७२ ९२७२६ व ६५०००
हिप्परगी ५२१.२६ व २.५८ २८२७९ व ७६९८८
१८ जुलै आलमट्टी ५१७.९८ व ९७.६१ ४३४७८ व ६५०००
हिप्परगी ५२०.५० व २.४२ ४२६६७ व ४१५५५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.