Railway Station : सांगली रेल्वे स्थानकावरून तब्बल 12 लाख प्रवाशांनी केला प्रवास; सात महिन्‍यांत मोठा विक्रम

सांगली रेल्वे स्थानकावरून (Sangli Railway Station) गेल्या सात महिन्यांत तब्बल १२ लाख प्रवाशांनी चढउतार केली आहे.
Sangli Railway Station
Sangli Railway Stationesakal
Updated on
Summary

गेल्या वर्षी १ एप्रिल ते ३० ऑक्टोबरपर्यंत सांगली रेल्वे स्टेशनवर विक्रमी ३ लाख ४५ हजार तिकिटांची विक्री झाली आहे.

सांगली : सांगली रेल्वे स्थानकावरून (Sangli Railway Station) गेल्या सात महिन्यांत तब्बल १२ लाख प्रवाशांनी चढउतार केली आहे. हा विक्रमी आकडा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आरक्षित तिकीट उलाढालीत तब्बल ८० टक्क्यांची वाढ दिसते आहे. जिल्ह्याच्या ठिकाणचे हे स्थानक विकसित व्हावे, या आग्रही भूमिकेला बळ देणारी ही आकडेवारी आहे.

येत्या ३१ मार्चपर्यंत सुमारे २१ लाख प्रवासी या स्थानकाचा लाभ घेतील, असा विश्‍वास रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उमेश शहा (Umesh Shah) यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. शिवाय, आरक्षित तिकिटातील वाढीमुळे सांगलीचे नाव मोठ्या स्थानकांच्या यादीत समाविष्ट होण्याबाबत आशाही व्यक्त केली आहे. या स्थितीत सांगली रेल्वे स्टेशनवर वाढीव सुविधा, ‘संपर्क क्रांती’चा गाडीला थांबा द्यावा. सांगली स्टेशनवरून नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

Sangli Railway Station
'त्या' हल्ल्याप्रकरणी आमदार सतेज पाटलांवर गुन्हा दाखल होणार? खासदार धनंजय महाडिकांनी दिली महत्त्वाची अपडेट

गेल्या वर्षी १ एप्रिल ते ३० ऑक्टोबरपर्यंत सांगली रेल्वे स्टेशनवर विक्रमी ३ लाख ४५ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. साडेतीन लाख प्रवासी सांगली रेल्वे स्टेशनवरून वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये चढले आहेत. बाहेरगावाहून ३ लाख ८ लाख प्रवासी सांगली रेल्वे स्टेशनवर उतरले आहेत. सुमारे २७ हजार ५०० प्लॅटफॉर्म तिकीट काढले गेले.

मासिक पास दर महिन्याला बुकिंग करणारे १५० लोक व अन्य रेल्वे स्टेशन वरून सांगली रेल्वे स्टेशनवर येणारे सुमारे दोन हजार पासधारक रोज सांगली स्टेशनवर चढ-उतर करतात. एकूण ४.५ लाख पासधारकांनी सांगली स्टेशन वरून सात महिन्यांमध्ये चढउतार केली आहे. एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ म्हणजेच मागच्या वर्षी सांगली रेल्वे स्टेशनवर एकूण ९० हजार आरक्षित तिकिटांची विक्री झाली होती.

Sangli Railway Station
CM Eknath Shinde : दहा एकर जागा खरेदी करुन सावित्रीबाईंचं 100 कोटींचं स्मारक उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

तुलनेत यावर्षी फक्त सात महिन्यांत ९४ हजार ३२१ आरक्षित तिकिटांची विक्री झाली आहे. रेल्वे बोर्डाच्या निकषाप्रमाणे २० लाख प्रवासी व २० कोटी उत्पन्न देणारे रेल्वे स्टेशन हे एनएसजी-३ या कक्षेमध्ये असते. तेथे अनेक वाढीव सोयी-सुविधा पुरविल्या जातात. नव्या गाड्या सुरू केल्या जातात. त्याबाबत सांगली आता हक्काने मागू शकणार आहे.

Sangli Railway Station
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या आईच्या चारही मालमत्तेचा होणार लिलाव; 'या' गावात उद्या लागणार बोली

नव्या गाड्यांची मागणी

सांगली रेल्वे स्टेशनवरून पंढरपूर, सोलापूर, बेळगाव, हुबळी, गुहागर, बंगळूर, चेन्नई आदी ठिकाणी जाणाऱ्या नवीन रेल्वे गाड्या सुरू व्हाव्यात, ही मागणी अनेक प्रवासी संघटनांनी केली आहे. चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती, यशवंतपूर-निजामुद्दीन संपर्क क्रांती या द्वि-साप्ताहिक रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपने केली आहे. रेल्वे बोर्डाच्या निकषांपेक्षा पाचपट तिकीट विक्री होत असल्याने संपर्क क्रांती, वंदे भारत, राजधानी, दुरंतो, शताब्दी, जनशताब्दी तेजस अशा भविष्यात सुरू होणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा दिला पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली आहे. सुटीतील गाड्या व आषाढी-कार्तिकी एकादशीनिमित्त सांगलीतून गाड्या सोडाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.