कृष्णा निवडणूक रणांगण; विद्यमान 14 संचालक पुन्‍हा रिंगणात

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे
कृष्णा निवडणूक रणांगण; विद्यमान 14 संचालक पुन्‍हा रिंगणात
Updated on

आळसंद : सांगली - सातारा जिल्ह्याचे (satara-sangli) कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (krishna sahakari sakhar karkhana) निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे.‌ जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने डॉ. सुरेश भोसले यांच्यासह तब्बल १० विद्यमान संचालकांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात (election) उतरवलेय. कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्यासह चार जण निवडणुकीला सामोरे जात आहे. रयत संघर्ष मंचच्या‌ डॉ. इंद्रजित मोहिते यांनी बहुतांशी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. १४ विद्ममान संचालक निवडणूक मैदानात नशीब आजमावत आहेत.

सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेतृत्व डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत.‌ त्यांनी डॉ. सुरेश भोसले (रेठरे बुद्रुक), धोंडिराम जाधव (दुशेरे), जगदीश जगताप (वडगाव हवेली), दयाराम पाटील (काले), लिंबाजी पाटील (तांबवे), जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील (बोरगाव), गुणवंतराव पाटील (आटके), निवासराव थोरात (कार्वे), संजय पाटील (इस्लामपूर), जयश्री पाटील (बहे) यांना पुनः उमेदवारी दिली आहे. पांडुरंग होनमाने (चिंचणी) यांचा पत्ता कट करून अविनाश खरात (खरातवाडी) यांना तर ब्रिजराज मोहिते (वांगी) यांच्या ऐवजी देवराष्ट्रेचे जयवंतराव भोसले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. सुजित मोरे (रेठरे हरणाक्ष) यांच्याऐवजी उच्चशिक्षित व आदर्श सरपंच जे. डी. मोरे (रेठरे हरणाक्ष) यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

कृष्णा निवडणूक रणांगण; विद्यमान 14 संचालक पुन्‍हा रिंगणात
'शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्यांना वाळव्यात फिरू देणार नाही'

संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्यासह चार जण निवडणूक लढवत आहेत. अविनाश मोहिते (रेठरे ब्रुदूक), अशोक जगताप (वडगाव हवेली), सुभाष पाटील (नेर्ले), शिवाजी आवळे (शिरटे) यांना पुन्हा पसंती दिली आहे. पांडुरंग मोहिते (मोहित्यांचे वडगाव) यांच्या वयाचा विचार करता त्याऐवजी देवराष्ट्रेचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख समर्थक माणिकराव मोरे यांना पसंती दिली आहे.

या गावांना तिन्ही पॅनेलची पसंती (कंसात पॅनेलची नावे)

घाटमाथ्यावरील देवराष्ट्रे : माणिकराव मोरे (संस्थापक), बाबासाहेब शिंदे (सहकार), बापूसाहेब मोरे (रयत संघर्ष मंच)

येडेमच्छिंद्र : रयत संघर्ष मंचकडून संजय पाटील, संस्थापक तर्फे बाबासाहेब पाटील, सहकारकडून‌ शिवाजी पाटील.

रेठरे हरणाक्ष : जे. डी. मोरे (सहकार), महेश पवार (संस्थापक), विवेकानंद मोरे, विश्वासराव मोरे यांना रयत संघर्ष मंचतर्फे मैदानात उतरले आहेत.

नेर्ले : संभाजीराव पाटील (सहकार), प्रशांत पाटील (रयत संघर्ष मंच),

बहे : जयश्री पाटील (सहकार), मीनाक्षीदेवी दमामे (संस्थापक), सत्वशीला थोरात (रयत संघर्ष मंच) यांना महिला गटातून उमेदवारी दिली आहे.

रेठरे ब्रुदूक : सहकारचे नेते डॉ. सुरेश भोसले, संस्थापकचे नेते अविनाश मोहिते, रयत संघर्ष मंचचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते.

काले : दयाराम पाटील (सहकार), अजित पाटील (रयत संघर्ष मंच) उमा देसाई, पांडुरंग पाटील (संस्थापक) हे नशीब आजमावत आहेत.

वडगाव हवेली : जगदीश जगताप (सहकार), अशोक पाटील (संस्थापक), डॉ. सुधीर जगताप (रयत संघर्ष मंच),

आटके : गुणवंतराव पाटील (सहकार), विजयसिंह पाटील (संस्थापक), सयाजी पाटील (रयत संघर्ष मंच) अशा आठ गावात तिन्ही पॅनेल प्रमुखांनी उमेदवारी दिली आहे.

कृष्णा निवडणूक रणांगण; विद्यमान 14 संचालक पुन्‍हा रिंगणात
शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे महत्व काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.