केवळ एका व्यक्तीलाच दिली लस; बेळगाव जिल्ह्यातील परिस्थिती

बेळगावातील ही मोहीम ठप्पच; आरोग्य विभागाचा दुजोरा
केवळ एका व्यक्तीलाच दिली लस; बेळगाव जिल्ह्यातील परिस्थिती
Updated on

बेळगाव : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील केवळ एकाच व्यक्तीला कोरोनाची लस (covaxin drive belgaum) देण्यात आली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये या वयोगटातील नागरिकांना लस दिली जात असताना बेळगावात मात्र ही मोहीम ठप्पच आहे. जिल्ह्यातील केवळ एकाच व्यक्तीला कोरोनाची लस देण्यात आल्याच्या माहितीला आरोग्य विभागानेही (health department belgaum) दुजोरा दिला आहे. (18 to 44 age group people only one person covaxin in belgaum district)

राज्यात (karnataka) आतापर्यंत या वयोगटातील १७ हजार ५१९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. बंगळूर शहरात (bangalore city) कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे तेथे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. बंगळूर शहरात १२ हजार १८८ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. याशिवाय रामनगर, चिक्कबळ्ळापूर, मंड्या, हासन, तुमकूर, शिमोगा, उडपी, रायचूर, कोडगू, कोलार, बंगळूर ग्रामीण, बळ्ळारी, चिक्कमंगळूर, चामराजनगर, चित्रदुर्ग, गुलबर्गा, म्हैसूर, बंगळूर नगर जिल्‍ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा राज्यात सर्वात मोठा आहे.

केवळ एका व्यक्तीलाच दिली लस; बेळगाव जिल्ह्यातील परिस्थिती
परिचारिका दिन विशेष : काळजावर दगड ठेवून 'आई' निभावतीये कर्तव्य

पण शासनाने बेळगावात ही लसीकरण (covid-19 vaccination) मोहीमच सुरू केलेली नाही. ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरीकांच्या लसीकरणाबाबत जिल्ह्यात गंभीर स्थिती आहे. ज्यांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे, त्यांना प्राधान्याने दुसरी लस दिली जाणार आहे. ज्यांनी पहिल्या लसीसाठी नोंदणी केली आहे, त्यांना लशीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कर्नाटकचा विचार केला तर १० मे पर्यंत १ कोटी ६ लाख नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील ६ लाख ४९ हजार ६०० जणांना कोरोनाची लस मिळाली आहे, पण जिल्ह्यातील लसीकरणचा वेग खूपच मंदावला आहे. एप्रिल महिन्यात लसीकरण मोहीम जिल्ह्यात धडाक्यात सुरू होती, पण एप्रिलअखेरीस लसीकरणाचा वेग मंदावला आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे ५० टक्के उिद्दष्टही अद्याप पूर्ण झालेले नाही.

काही जिल्ह्यांतच बंदी

केंद्र शासनाने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्याची घोषणा केली होती, पण कर्नाटकात ही मोहीम १ मे रोजी सुरू होणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी जाहीर केले होते. लस उपलब्ध नसल्यामुळेच हा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर १० मे पासून या वयोगटातील लसीकरण सुरू करण्याची नवी घोषणा झाली. बहुतेक जिल्ह्यांमध्ये ही लसीकरण मोहीम सुरूही झाली, पण बेळगाव, मंगळूर, दावणगेरे, धारवाड, हावेरी, गदग, कारवार, यादगीर, विजापूर या जिल्ह्यात ही मोहीम अद्याप सुरूच झालेली नाही.

केवळ एका व्यक्तीलाच दिली लस; बेळगाव जिल्ह्यातील परिस्थिती
कोरोना : लहान मुलांमध्ये आढळणारी प्रमुख लक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.