पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे. अतिधोकादायक असलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली आहे.
सांगली : जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पूरबाधित (Sangli Flood) १०९ गावांमध्ये ३०८८ धोकादायक घरे आहेत. संबंधित घरांच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. धोकादायक घरे, इमारती लवकर उतरवून घ्याव्यात किंवा पाडून टाकाव्यात. पावसाळ्यात कोणती दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहणार नाही, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरग्रस्त तालुक्यांतील १०९ गावांचा सर्व्हे करण्यात आला. या गावांमधील धोकादायक, तसेच पडलेल्या इमारतींची माहिती घेण्यात आली आहे. पडझड झालेली, कमी धोकादायक, अतिधोकादायक, दुरवस्था झालेली घरे, इमारतींची माहिती घेण्यात आली आहे. ज्या इमारती अधिक धोकादायक आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या चार तालुक्यांना पुराचा फटका बसतो. पावसाळ्यात या चार तालुक्यांतील १०४ गावे संभाव्य पूरग्रस्त म्हणून विशेष लक्ष दिले जाते. सन २००५, २००६ तसेच २०१९ आणि २०२० या वर्षी आलेल्या महापुराचा फटका या गावांना बसला होता. त्यामुळे प्रतिवर्षी पावसाळ्यात १०४ गावांकडे जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष असते. या गावांमधील आरोग्य व्यवस्था, तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता याचे काटेकोर नियोजन जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पावसाळ्याच्या काळात धोकादायक, पडझड झालेली, दुरवस्था झालेली घरे, इमारती पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी त्यांचे सर्वेक्षण करून संबंधित मालमत्ताधारकांना सुरक्षिततेविषयी काळजी घेण्याबाबत नोटिसा बजावल्या जातात. यंदाही पावसाळ्यापूर्वीच वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या संभाव्य पूरबाधित तालुक्यांतील १०९ गावांचा सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ३०८८ धोकादायक घरे, इमारती आहेत, तर ५६० घरे पडली आहेत.
वाळवा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ३६ गावे, पलूस तालुक्यातील ३३ गावे, शिराळा तालुक्यातील २१ गावे आणि मिरज तालुक्यातील १९ गावे अशा १०९ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये एक लाख दहा हजारांहून अधिक घरे समाविष्ट आहेत. त्यातील १७१० घरांना नोटिसा बजावल्या आहेत. या चारही तालुक्यांतील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित गावच्या तलाठ्यांमार्फत या नोटिसा बजावल्या आहेत.
मिरज १९ २२८५५ ५५३ ७२ ८४
पलूस ३३ ३७१५६ ९०५ १४६ ९५४
शिराळा २१ १६९३९ २६३ ११९ २३९
वाळवा ३६ ३३४७० १३६७ २२३ ४३३
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे. अतिधोकादायक असलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली आहे. पावसाळ्यात या मालमत्तांना धोका असतो. त्यामुळे या घरे, इमारतीमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपली व्यवस्था करावी. जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास जीवित-वित्तहानी होणार नाही.
- शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.