कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवस अतिवृष्टी झाली. एका दिवसात तब्बल ८ टीएमसीने धरणातील पाणीसाठा वाढला. हे संकट मोठे होते.
सांगली : कृष्णा नदीसह (Krishna River) उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे यंदा बहुतांश धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा होणार, हे निश्चित आहे. आलमट्टी धरण (Almatti Dam) शंभर टक्के भरले असून, कोयनेत ९०, तर वारणा धरणात ३० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. यावर्षी १३ ऑगस्टपर्यंत राजापूर बंधाऱ्यातून ४२५ टीएमसी पाणी कर्नाटक हद्दीत वाहून गेले आहे. आलमट्टी धरण तीनवेळा आणि हिप्परगी धरण दोनवेळा भरेल एवढे हे पाणी आहे.