Chandoli Dam Water : चांदोली धरणात ५० टक्के पाणीसाठा

चांदोली उद्यानातील ओढे-नाले नैसर्गिक उमाळ्याने प्रवाहित झाल्याने धरणात पाण्याची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
Chandoli Dam
Chandoli Damsakal
Updated on

शिराळा - दोन दिवस शिराळ्यासह तालुक्यात पावसाने थोडी उसंती घेतली असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम सुरू आहे.

चांदोली उद्यानातील ओढे-नाले नैसर्गिक उमाळ्याने प्रवाहित झाल्याने धरणात पाण्याची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या धरणात ७९३० क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने आज मंगळवारी चांदोली धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.

चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी आहे. सध्या धरणात १७.०८ टी.एम.सी.म्हणजे ४९.६४ टक्के पाणीसाठा झाला असल्याने धरण ५० टक्के भरले आहे. आठ दिवसांपासून कोकरूड रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. कोकरूड येथे येण्यासाठी तुरुकवाडी मार्गे सुमारे १० किलोमीटर प्रवास करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने पाण्या अभावी रखडलेली रोपं लावणीची कामे गतीने सुरु झाली आहेत.

धरणातील पाणीसाठा

आज सकाळी ७ वाजता धरणाच्या पाण्याची पातळी ६०६.२५ मीटर तर पाणीसाठा ४८९.५७ द.ल.घ.मी. होता. धरणात १७.०८ टी.एम.सी. म्हणजे ४९.६४ टक्के पाणीसाठा झाला होता.त्यामुळे चांदोली धरण ५० टक्के भरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.