पोलिस कॉन्स्‍टेबलची ५ हजार पदे भरणार : गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र

राज्यात पाच हजार पोलिस कॉन्स्टेबल पदांची भरती लवकर होणार असल्याची माहिती गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी आज (ता.६) पोलिस आयुक्तालय सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
Home Minister Arga Gyanendra
Home Minister Arga Gyanendrasakal
Updated on
Summary

राज्यात पाच हजार पोलिस कॉन्स्टेबल पदांची भरती लवकर होणार असल्याची माहिती गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी आज (ता.६) पोलिस आयुक्तालय सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

बेळगाव - राज्यात पाच हजार पोलिस कॉन्स्टेबल पदांची भरती लवकर होणार असल्याची माहिती गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी आज (ता.६) पोलिस आयुक्तालय सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, ‘राज्यात ३५ हजार पोलिसांची विविध पदे रिक्त होती. त्यापैकी २३ हजार पदांची भरती करण्यात आली असून, १२ हजार पदे रिक्त आहेत. पीएसआय घोटाळ्यामुळे रिक्त पदांची भरती रखडली. पण, आता परत भरती केली जाईल. एक किंवा दोन महिन्यात नवीन पाच हजार पोलीस कॉन्स्टेबल पदे भरली जातील.’

मंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, ‘दोन दिवसांच्या बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे. आज पोलीस आयुक्तालयात निर्मित पोलीस म्युझियमची पाहणी केली. त्याठिकाणी खूप चांगले म्युझियम उभारण्यात आले आहे. एक चांगली संकल्पना पुढे आणली आहे. पोलीस दलाचे हात बळकट करण्यासाठी सरकार कठीण कार्यक्रम हाती घेत आहे. त्याचाच भाग म्हणून ५ हजार कॉन्स्टेबल व २ हजार अग्नीशामक दलात पदे भरण्यात येईल. गुजरात राज्याच्या धर्तीवर एफएसएल विभागाची निर्मिती कर्नाटकात करण्यात येणार आहे. शंभर नवीन पोलीस ठाणे उभारली जात आहेत. त्यापैकी ३ पोलीस ठाण्यांचा गुरुवारी (ता.७) लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यापैकी एक रायबाग तालुका कुडची आणि अथणी तालुक्यामध्ये दोन नवीन पोलीस ठाण्यांचे उद्‍घाटन करण्यात येईल.’

रामदूर्ग पोलिसांचे अभिनंदन

हुबळीत एका हॉटेलमध्ये सरळ वास्तू तज्ज्ञ म्हणून प्रसिध्द असलेले चंद्रशेखर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेनंतर केवळ २ तासांत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. बेळगाव जिल्ह्यात रामदूर्ग पोलिसांनी धाडसी कारवाई केली. त्यामुळे अभिनंदन पत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी दिली.

सिध्दारामय्यावर टीका

पोलिस भरतीत घोटाळा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पारदर्शक तपास केला. प्रकरणाची पाळेमुळे खणून काढत आरोपींना जेरबंद केले. त्याबद्दल कौतुक करण्याऐवजी राजकीय लाभ घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या व केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार तथ्यहिन आरोप करत आहेत. तसेच सिध्दरामय्या यांच्या कार्यकाळात पीयूसी पेपप फुटी, पोलिस भरती आणि इतर अनेक घोटाळे घडलेले आहेत. त्यांचा तपास करून आरोपांना बेड्या ठोकण्यात कमी पडल्याची टीका गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.