‘मोदी’ बकरा आजारी पडून मृत्यू झाला. २०१९ मध्ये येथील यात्रेत जाधव यांच्या अवघ्या दहा महिन्यांच्या बकऱ्याला १७ लाखांची मागणी झाली. यात्रेतील स्पर्धेत बाजी मारत बकऱ्यांनी ‘चॅम्पियन’ नाव सार्थ ठरवले.
आटपाडी : येथील मेंढपाळ पट्ट्याला त्यांच्या ५१ लाखांच्या चॅम्पियन बकऱ्यापासून (Champion Goat) तीन वर्षांत झालेल्या २१ पिलांपासून तब्बल ६२ लाख रुपये मिळवलेत. या ‘चॅम्पियन’ बकऱ्याचा राज्यभर मेंढपाळात बोलबाला आहे. सांगोला येथील बाबू मेटकरी यांच्याकडे अत्यंत देखणा आणि अनेक स्पर्धेता गाजवलेला ‘मोदी’ बकरा होता. आटपाडीचे सोमनाथ जाधव (Somnath Jadhav) यांनी त्यांच्या मेंढीला मोदी बकरा प्रजोत्पादनासाठी वापरला होता. त्याच्यापासून नर पिल्लू जन्माला आले.