Tasgaon Accident : नातीच्या वाढदिवसाचा केक कापला अन्‌ काळाने घातला घाला; कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 ठार

या अपघातामुळे तासगाव (Tasgaon Accident) शहरातील पाटील कुटुंब संपूर्ण कोलमडून गेलं.
Tasgaon Accident
Tasgaon Accidentesakal
Updated on
Summary

राजवीचा वाढदिवस तिच्यासाठीच शेवटचा ठरला. सहा जणांसाठी घातवार ठरला. सहा महिन्याची कार्तिकी तर तिच्या आई प्रियांकाच्या कुशीतच शेवटपर्यंत होती.

तासगाव : नातीच्या वाढदिवसाचा (Birthday) केक कापला... जल्लोष झाला... टाळ्या वाजवल्या, छान जेवण झाले. तिला दीर्घायुष्य लाभो, असा सगळ्यांना आशीर्वाद दिला... मात्र, हा सोहळा या कुटुंबासाठी अखेरचा ठरेल, याची पुसटशी कल्पनाही कुणाला नसेल.

जिचा वाढदिवस झाला, त्या चिमुरडीसह सहा जणांसाठी ‘तो’ घातदिन ठरला. या अपघातामुळे तासगाव (Tasgaon Accident) शहरातील पाटील कुटुंब संपूर्ण कोलमडून गेलं. पती-पत्नी, त्यांची मुलगी आणि तीन नाती यांच्यासाठी मंगळवारची (ता. २८) रात्र काळरात्र ठरली. डुलकी लागली की आणखी काय झालं...? त्या क्षणानं कुटुंब उद्‍ध्वस्त केलं.

Tasgaon Accident
नातीचा वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 जण ठार

तासगाव शहरातील इंजिनिअर, बांधकाम व्यावसायिक राजन जगन्नाथ पाटील. नातीच्या वाढदिवसासाठी कोकळेत पत्नी सुजातासह गेले. समवेत विवाहित मुलगी प्रियंका खराडे आणि तिच्या दोन मुली ध्रुवा आणि कार्तिकी होत्या. काल सायंकाळी पाच वाजता ते कोकळेत गेले. तेथे कन्या स्वप्नाली विकास भोसले हिची एकुलती मुलगी राजवीचा तिसरा वाढदिवस होता. दोन्ही कुटुंबांनी काल सायंकाळी वाढदिवस आनंदाने साजरा केला. रात्री अकरा वाजता ते माघारी यायला निघाला. सोबत राजवी आणि तिची आई स्वप्नाली या दोघीही तासगावकडे माहेरी यायला निघाल्या.

Tasgaon Accident
Women Death Case : महालिंगपूरममध्ये गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; सांगलीतील डॉक्टर ताब्यात, चार डॉक्टरांची नावेही निष्पन्न

तासगावातील घरापासून अवघे चार किलोमीटर अंतर असताना राजन पाटील यांचा मोटारीवरील ताबा सुटला. ते थेट वीस-पंचवीस फूट खोल असलेल्या ताकारी कालव्यात समोरील भिंतीवर जाऊन आदळून उलटली. धडक इतकी जोरदार होती, मोटारीतील सहा जण जागीच ठार झाले. जखमी स्वप्नाली रात्रभर गाडीतच अडकून पडल्या. एकूणच, हा सारा प्रकार धक्कादायक होता. राजन पाटील यांना डुलकी लागल्याने त्यांचा मोटारीवरील ताबा सुटला असावा, असा अंदाज आहे. त्या एका क्षणार्धात सारे होत्याचे नव्हते झाले.

राजवीचा वाढदिवस तिच्यासाठीच शेवटचा ठरला. सहा जणांसाठी घातवार ठरला. सहा महिन्याची कार्तिकी तर तिच्या आई प्रियांकाच्या कुशीतच शेवटपर्यंत होती. सगळे झोपेत असताना कदाचित वाढदिवसाच्या आठवणी मनात रेंगाळत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. एकूणच, अपघातस्थळावरील सगळे चित्र अतिशय हृदय पिळवटून टाकणारे होते.

Tasgaon Accident
Jaysingpur Pregnancy Test : गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू, बनावट महिला डॉक्टरला अटक; कर्नाटक पोलिसांची कारवाई

अपघाताची माहिती सकाळीच कळाली. अपघात झाल्याक्षणी मदत मिळाली असती तर यातील काहीजणांचे प्राण वाचू शकले असते, याची हळहळ सगळेजण व्यक्त करत होते. आयुष्याची दोरी बळकट म्हणूनच स्वप्नाली भोसले वाचू शकल्या. त्यांची एकुलती एक मुलगी त्यांच्यापासून दरावली. आजोबा राजन यांचा २५ मार्च रोजी वाढदिवस साजरा झाला होता. सुन्न झालेले पाटील कुटुंब या धक्क्यातून कसे सावरणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.