'ताकारी'च्या पाण्याने या भागात दृष्ट लागण्यासारखी शेती पिकून सर्वसामान्य लोकांच्या जीवनात झालेला आर्थिक बदल इथली जनता अनुभवत आहे.
वांगी : सांगली जिल्ह्यात कायम दुष्काळी असणाऱ्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांना मागील सुमारे २५ वर्षांपासून सुजलाम्-सुफलाम् केलेल्या ताकारी योजनेचे (Takari Scheme) भवितव्य कोयना धरणातील जलसाठ्यावर अवलंबून असते.
त्यामुळे ताकारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नजरा कोयना धरणातील पाणीसाठ्यावर खिळून असतात. सध्या धरणात ६५ टी.एम.सी. हून अधिक पाणीसाठा झाल्याने 'ताकारी' लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटली असून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
ताकारीच्या लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती केवळ कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. प्रतिवर्षी या भागात कमी पाऊस पडत असला तरी कोयना धरण भरले की 'ताकारी' लाभक्षेत्रातील शेतकरी निश्चिंत होतात. मात्र, यावर्षी १० जुलैपर्यंत कोयना पाणलोट क्षेत्रात प्रतिवर्षीप्रमाणे पाऊस पडत नव्हता व पाणीसाठा वाढत नव्हता. धरण नाही भरले तर आपले कसे होणार, या चिंतेने ताकारी लाभक्षेत्राच्या तोंडचे पाणी पळाले होते.
सध्या कोयनेत ६५ टी.एम.सी. च्या वर पाणीसाठा गेल्याने भरणार आहे. आणि अद्यापही पाऊस कोसळत असल्याने धरण भरण्याची शाश्वती झाली आहे. कारण, याच ताकारीच्या पाण्याने मागील २५ वर्षांत वांगी भागात प्रचंड आर्थिक समृद्धी आणली आहे.
'ताकारी'च्या पाण्याने या भागात दृष्ट लागण्यासारखी शेती पिकून सर्वसामान्य लोकांच्या जीवनात झालेला आर्थिक बदल इथली जनता अनुभवत आहे. ऊस, द्राक्ष, केळी, हळद, आले; याशिवाय फळभाज्या व पालेभाज्या उत्पादनातून शेतकऱ्यांनी प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये मिळणार आहेत.
प्रतिवर्षी कमी पर्जन्यमान असणाऱ्या या भागासाठी ताकारी योजना वरदान ठरली आहे. कारण, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा एकमेव आधार ही योजनाच आहे. यंदा पाऊस लांबल्याने धरण अपेक्षित वेळेत भरले नाही. शेतकऱ्यांची धाकधूक वाढली. मात्र, सध्याचा पाऊस पाहता धरण काही दिवसांत नक्कीच शंभर टक्के भरणार आहे.
राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.