निपाणी : कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यातील विविध मंदिरे व यात्रीनिवासांसाठी 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा धर्मादाय, वक्फ व हाज मंत्री शशिकला जोल्ले यांनी केली.निपाणी येथे व्हीएसएम संस्थेच्या मैदानावर बुधवारी (ता. १३) रात्री बसवज्योती युथ फाउंडेशनतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त 'दांडिया नाईट' हा गरबा व दांडियाचा कार्यक्रम झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री जोल्ले बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, 'उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे कर्नाटकामधील भाविकांच्या सोयीसाठी यात्रीनिवास बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 40 कोटीचा निधी मंजूर केला आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीशैल येथे यात्री निवासासाठी ११ कोटी तर तिरुपती बालाजी येथे दुसऱ्या यात्रीनिवासासाठी देखील ११ कोटी रुपये मंजूर केले आहेत. निपाणी तालुक्यातील ममदापूर येथील अंबिका देवस्थानाच्या विकासासाठी 4 कोटी 16 लाख तर निपाणीतील ग्रामदैवत रविवार पेठेतील महालक्ष्मी मंदिरासाठी १ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या दोन्ही मंदिरांचा धनादेश आजच सुपूर्द देखील केला आहे. पंढरपूर व गुड्डापुर येथे यात्री निवासाचे भूमिपूजन महिन्याभरात होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी आपल्या खात्यातर्फे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा प्रयत्न सुरू आहे.'
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी, हालशुगरचे उपाध्यक्ष एम. पी. पाटील, बसवप्रसाद जोल्ले, ज्योतीप्रसाद जोल्ले, कर्नाटक ऑईल फेडरेशनचे संचालक बी. एस. रेवनकट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.