कोर्टाच्या निकालानंतर महापालिका निवडणुकीसाठी आज 7 अर्ज दाखल

Election
ElectionSakal
Updated on
Summary

बेळगाव महापालिका निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे.

बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणूकीसाठी (belgaum election 2021) गुरूवारी सात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता उमेदवारी अर्जांची संख्या नऊ झाली आहे. गुरूवारी दोन माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात सरला हेरेकर व मिनाक्षी चिगरे यांचा समावेश आहे. (belgaum update) बुधवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात माजी नगरसेवक रमेश कळसण्णावर व शंकरगौडा पाटील यांचा समावेश होता. (political News)

गुरूवारी प्रभाग १८, १९, २५ व ४६ मधून प्रत्येकी एक तर प्रभाग १३ मधून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग १८ मधून माजी नगरसेविका मैनबाई चौगुले यांचे पती शिवा चौगुले यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग १९ मधून विवेक भस्मे, प्रभाग २५ मधून माजी नगरसेविका सरला हेरेकर तर प्रभाग ४६ मधून शिवानंद मुगळीहाळ यानी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग १३ मधून माजी नगरसेविका मिनाक्षी चिगरे, रविता रेडेकर व स्वाती केरकर यानी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मागील सभागृहातील ५८ पैकी तीन नगरसेवक पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

Election
ठरलं! महापालिका निवडणूक होणार; विरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली

बेळगाव महापालिका (belgaum municipal corporation) निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे. निवडणूकीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल झालेली याचिका, शिवाय निवडणूक अर्जासोबत दाखल करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे मिळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे पहिले दोन दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. तिसऱ्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी अर्जांची संख्या वाढण्याची अपेक्षा होती. परंतु, केवळ सातच अर्ज दाखल झाले आहेत.

शुक्रवारी मोहरमची शासकीय सुट्टीमुळे अर्ज दाखल करता येणार नाहीत. त्यामुळे शनिवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होवू शकते. रविवारीही सुट्टीमुळे अर्ज दाखल करता येणार नाहीत. परिणामी अखेरच्या दिवशी म्हणजे २३ ऑगस्ट रोजी सर्वच अर्जभरणा केंद्रांवर झुंबड उडण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका कार्यालयाच्या परिसरात कर्नाटक राखीव पोलिस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गुरूवारी राखीव पोलिस दलाची तुकडी महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात दाखल झाली.

Election
'बाळासाहेबांच्या स्मृतीचं दर्शन पदराआडून'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.