Accident News : बुद्ध पौर्णिमेनिमित्त गाणगापूरला जाताना भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

एकाच कुटुंबातील चौघे; गाणगापूरहून परतताना घटना
Accident Bijapur-Guhagar State Road Five people died hospital police
Accident Bijapur-Guhagar State Road Five people died hospital policeesakal
Updated on

जत : विजापूर-गुहागर राज्य मार्गावर जतपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ देवदर्शन करून परतणाऱ्या मोटारीने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघे व चालक अशा पाच जणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

नामदेव पुनाप्पा सावंत (वय ६५), पद्मिनी नामदेव सावंत (६०), मयुरी आकाशदिप सावंत (३८, सर्व मूळ रा. बनाळी, सध्या रा. जत), श्लोक आकाशदीप सावंत (वय ८), चालक दत्ता हरीबा चव्हाण (वय ४०, रा. जत) अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी (ता. ५) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात वरद सावंत (वय १०) हा देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री जत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मृत व्यक्तींना गाडीतून बाहेर काढून रात्री उशिरा त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले होते.

घटनास्थळी व जत ग्रामीण रुग्णालय परिसरात बघ्याची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जत येथील बालाजी ट्रॅव्हल्सचे मालक आकाशदीप सावंत यांचे वडील नामदेव, आई पद्मिनी, पत्नी मयुरी मुले श्लोक व वरद हे भाड्याच्या स्विफ्ट कार घेऊन बौद्ध पोर्णिमेनिमित्य गाणगापूर येथे देवदर्शनाला गेले होते. दत्ता चव्हाण हे गाडी चालवत होते. गाणगापूरला दर्शन घेवून विजयपूरहुन जतला परतत असताना सावंत कुटूंबियावर काळाने घाला घातला.

जतपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर अमृतवाडी फाटा येथे स्विफ्ट, डंपर व ट्रक यांच्यामध्ये विचित्र भीषण अपघात झाला. ट्रकने स्विफ्टला उडविले व त्याचबरोबर रस्त्याकडेला उभा असलेल्या डंपरलाही जोराची धडक दिल्याने तिन्ही वाहने रस्त्याच्या खाली जावून पडली होती. यावरून अपघात किती भिषण होता समजू शकते.

या अपघातात स्विफ्ट गाडीतील नामदेव सावंत, पद्मिनी सावंत, मयुरी सावंत , श्लोक या चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमी स्विफ्टचा चालक दत्ता चव्हाण यास तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. वरद आकाशदीप सावंत हा मुलगा सुदैवाने बचावला आहे. त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जतचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी तातडीने भेट घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी व जत ग्रामीण रुग्णालय परिसरात बघ्याची मोठी गर्दी झाली होती.

शेगाव येथील पंधरा वर्षाच्या घटनेला उजाळा

शेगाव येथे १५ वर्षांपूर्वी भर बाजारात ट्रक घुसला होता. या अपघातात ट्रकने चिरडल्याने अनेकजण जखमी झाले होते तर सहाहुन अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. गेल्या दहा दिवसापूर्वी एका दाम्पत्याला कंटेनरने उडवले होते.

राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून जत मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. त्यात शुक्रवारी झालेल्या अपघातात पाचजण ठार झाले. अमृतवाडी येथील घटनेने पुन्हा पंधरा वर्षाच्या शेगावच्या घटनेच्या आठवणीला उजाळा मिळाला.

सावंत कुटूंबियावर काळाचा घाला

बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सावंत कुटुंबीय गाणगापूर देवदर्शनाला जाऊन रात्री घरी परतत होते. मात्र, अमृतवाडी येथे विचित्र व भीषण अपघाताने सावंत कुटुंबियांवर काळाने घाला घातला. परिसरातील नागरिकांनी बचाव कार्याला शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, हा अपघात इतका भीषण होता की, दोन चिमुकल्यासह पाच जणांना जीव गमवावा लागला. हि घटना समजताच बनाळी गावावर शोककळा पसरली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.