कोल्हापूरः कात्यायनीजवळ अपघातामध्ये एक महिला ठार

कोल्हापूरः कात्यायनीजवळ अपघातामध्ये एक महिला ठार
Updated on

कोल्हापूर - कात्यायनीजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटून काल दुपारी प्रवासी जीप उलटली. यामध्ये आदमापूर मंदिरात दर्शन घेऊन येणारी महिला भाविक ठार झाली तर १२ जण जखमी झाले. धोंडूबाई उत्तम मधाळे (वय ५५, रा. आळते, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. याबाबतची नोंद करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू होते. 

तात्यासाहेब हणमंत चव्हाण (वय ५०, रा. पंढरपूर), वत्सला सुभाष सकट (५०, रा. उंब्रज, ता. सातारा), मेघा राजू काळे (११), सुनीता राजू काळे (४०, दोघे, रा. कोल्हापूर), प्रमिला बबन कोठावळे (४०, रा. आळते, ता. हातकणंगले), चालक - संतोष सदाशिव डावरे (४९, रा. सोळांकूर, ता. राधानगरी), आनंदा केशव पाटील (४५), रुपाली आनंदा पाटील (४०, दोघे रा. टेकोली, शाहूवाडी), शशिकला किसन कांबळे (२१, रा. आळते, हातकणंगले), श्रावण राजू काळे (९, रा. टाकाळा, राजारामपुरी, कोल्हापूर), नमिता राजू कांबळे (१०, रा. आळते, हातकणंगले), संतोष विश्‍वनाथ लोखंडे (४०, रा. पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती, आदमापूर (ता. कागल) येथील बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी पंढरपूर, सोलापूरसह विविध भागातून भाविक आले होते. दर्शन घेऊन १२ प्रवासी एका वडाप जीपमधून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. कात्यायनीजवळील वळणावर जीप चालक संतोष डावरे यांचा गाडीवरील ताबा सुटला. तशी गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या चरीत उलटली. यामध्ये चालकासह प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या संजय मारुती पाटील (रा. राजारामपुरी) यांना दिसली. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा, करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक सुनील पाटील हे सीपीआरमध्ये दाखल झाले. दरम्यान जखमींची संख्या विचारात घेता सीपीआर प्रशासनानेही तातडीने उपचार सुरू केले. उपचारादरम्यान मधाळे या महिलेचा मृत्यू झाला. मात्र तिची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. दरम्यान जखमींतील तिघा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात 
दाखल केले. 

प्रवासी जीपला परवाना असून त्यात क्षमतेइतकेच प्रवासी होते, असे चालकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र याची कायदेशीररीत्या खातरजमा करून यात कोणी दोषी अाढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. 
- सुनील पाटील, 

पोलिस निरीक्षक, करवीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.