रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि राँग साईडने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत.
मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे. बोलेरोगाडी मधील एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूरवरून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. यावेळी राँग साईडहुन विटाने भरलेला ट्रॅक्टरला बोलेरोची धडक बसली आहे.
मयत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. वीट वाहतूक करणारी ट्रॅक्टर महामार्गावर उलट दिशेने येत होती, त्याला जावून बोलोरो गाडी धडकली आणि भीषण अपघातात पाच जण ठार झाले. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात अपघातात तब्बल २५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि राँग साईडने विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत.
वड्डी येथे राजीवनगर येथे बायपासला हा अपघात झाला. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा मालगाव फाटा ते मिरज टप्पा अपूर्ण होता. तो दोन दिवसांपूर्वीच सुरु झाला आहे. या रस्त्यावरून भरधाव वाहतूक सुरु झाली आहे. याआधी रस्ता बंद असताना अनेक वाहने उलट-सुलट दिशेने हवी तशी धावत होती.
आजही या भागातील एक वीट वाहतूक करणारी ट्रॅक्टर उलट दिशेने येत होती आणि बेलोरो गाडी चालकाना अशा पद्धतीने ट्रॅक्टर येईल, हे अपेक्षित नसावे. त्यामुळे त्यांची जोरदार धडक झाली. त्यात बोलोरोतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात एका बारा वर्षीय मुलाचा समावेश आहे. अन्य जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. धडक इतकी भीषण होती की बोलेरो गाडीचा पुढचा भाग पुर्णपणे फुटला आहे. एकाच कुटूंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.