भुईंज (जि. सातारा) : वाई शिरगाव घाटामध्ये ट्रक आणि एका चार चाकीच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान ठार झालेल्या व्यक्तीचे नाव अद्याप पाेलिसांना समजलेले नाही.
हा अपघात गुरुवारी रात्रीच्या सुमारास झाला. एमएच ११ एम ३५११ या ट्रक समोरून येणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक एमएच १२ जेवाय ४६८४ यास हुलकावणी देताना पलटी झाला. हा ट्रक बाेअरवेलच्या कामासाठी वापरला जाताे. हा ट्रक पलटी झाल्याने ट्रकवर बसलेले मजूर रस्त्यावर पडले तसेच त्यांच्या अंगावर ट्रकमधील लोखंडी अवजड पाइपही पडल्या.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार वाठार पिंपोडेकडून वाईच्या दिशेने येणारे चार चाकी वाहन एका अवजड वळणावर येताना समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळले. ही धडक इतकी भाषण हाेती की तार ताकी वाहन घाटातून खाली चाळीस फूट काेसळले.
जरुर वाचा - पुण्यातील युवकाने मित्रांना 20 लाखांना फसविले
दरम्यान अपघात झाल्याचे समजताच शिरगाव ग्रामस्थांनी तातडीने घाटात जाऊन मदतकार्य केले. यामध्ये त्यांनी जखमींना बाहेर काढले. हे मदत कार्य सरपंच दीपक तोडरमल, सागर भोसले, विकास भोसले, अजित मोरे यांनी युवकांचे सहकार्याने केले. घटनास्थळी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, भुईंज पोलीस उपनिरीक्षक श्याम बुवा, हवालदार धनाजी कदम शिवाजी तोडरमल, चंद्रकांत जाधव, विजय अवघडे आदींनी वहातुक सुरुळीत केली.
या अपघातामध्ये अतुल ढेकणे, गणेश देटे, दीपक गव्हाणे, व्यकंट देशमुख, परमेश्वर चव्हाण (सर्व राहणार उस्मानाबाद) हे सर्वणज जखमी झाले आहेत. त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.