Vita News : पुत्रविरहाने लेखाधिका-याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

विटा येथील रहिवासी व वसई-विरार महानगरपालिकेचे वित्त व लेखा अधिकारी विनायक सुरेश फासे (वय ४५) यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
Vinayak Fase
Vinayak Fasesakal
Updated on

विटा - येथील रहिवासी व वसई-विरार महानगरपालिकेचे वित्त व लेखा अधिकारी विनायक सुरेश फासे (वय ४५) यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांचा १९ वर्षीय मुलगा सिद्धार्थ याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुलगा अनपेक्षितपणे सोडून जाण्याचा धक्का फासे यांना सहन झाला नाही. चोवीस तासांत पितापुत्राचा दुर्दैवी अंत झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.