Sangli Crime : घरी खेळत असताना चिमुरडी आरोपीच्या जवळ गेली अन् नराधमानं तिच्यावर..

न्यायालयानं दोषीला सुनावली वीस वर्षांची शिक्षा
POCSO Act Minor Girl Sangli Police
POCSO Act Minor Girl Sangli Police esakal
Updated on
Summary

पीडित मुलगी खोलीत चेंडूने खेळत होती. खेळताना आरोपीच्या जवळ पडलेला चेंडू आणण्यासाठी मुलगी गेली असता आरोपी पिरजादे याने तिच्यावर अत्याचार केला.

सांगली : अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अत्याचार करणाऱ्या राजेबाकसर राजेसाब पिरजादे (वय ५९, जुना बुधगाव रोड, वाल्मिकी आवास योजना, सांगली) यास दोषी ठरवून वीस वर्षांची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सह सत्र न्यायाधीश (Court) डी. एस. हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली.

POCSO Act Minor Girl Sangli Police
Medha Patkar : '..तर पुन्हा कोल्हापूर-सांगलीत पूरस्थिती, आलमट्टीतून तातडीनं 2 लाख क्युसेकचा विसर्ग करा'

दंडाचे २५ हजार रुपये पीडित मुलीस देण्याचा आदेशही दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले. खटल्याची हकीकत अशी, फिर्यादी यांच्या घरी आरोपी राजेबाकसर पिरजादे हा बऱ्याच वर्षांपासून सुतारकाम करीत होता. त्यांच्या घरी तो किरकोळ दुरुस्तीची कामे करीत होता. त्यामुळे फिर्यादी आणि आरोपीची चांगली ओळख होती.

कामाच्या निमित्ताने आरोपी पिरजादे याचे फिर्यादी यांच्या घरी वारंवार येणे-जाणे होते. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी फिर्यादीच्या पतीने कामानिमित्त आरोपी पिरजादे यास घरी बोलावले. त्याला काम सांगून ते मुलाला आणण्यासाठी बाहेर गेले. त्यावेळी घरामध्ये फिर्यादी आणि सहावर्षीय मुलगी असे दोघेच होते. फिर्यादी स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होत्या.

POCSO Act Minor Girl Sangli Police
धक्कादायक! बहिणीला शेवटचा फोन करत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, पत्नीनंही स्वत: ला संपवण्याचा केला प्रयत्न

आरोपी पिरजादे बाहेरच्या खोलीत काम करीत होता. पीडित मुलगी खोलीत चेंडूने खेळत होती. खेळताना आरोपीच्या जवळ पडलेला चेंडू आणण्यासाठी मुलगी गेली असता आरोपी पिरजादे याने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मुलीने आईला सांगितली. फिर्यादींनी पतीस तातडीने बोलवून घेतले व आरोपी पिरजादे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

POCSO Act Minor Girl Sangli Police
Neelima Chavan Case : मृत्यूच्या आदल्या दिवशी नीलिमा कुठे होती? घातपात झाला का? पोलिसांनी दिली महत्वाची अपडेट..

याबाबत ‘पोक्सो’अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल झाला. हा खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात आलेल्या साक्षी व पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी राजेबाकसर पिरजादे यास वीस वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाचा तपास सांगली शहर पोलिस (Sangli Police) ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी केला. त्यांना पैरवी कक्षातील सीमा धनवडे, सुनीता आवळे, रेखा खोत, पी. जे. डांगे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.