Suresh Khade : मटका बंद न केल्यास पोलिस निरीक्षकांवरच कारवाई करणार; पालकमंत्र्यांचा सज्जड दम

पालकमंत्र्यांनी अवैध व्यवसाय रोखण्याकरिता कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनास दिल्या.
Suresh Khade Matka Police
Suresh Khade Matka Policeesakal
Updated on
Summary

कवलापूर, तासगाव परिसरात अतिशय कमी उंचीवर विमान घिरट्या घालत आहे.

सांगली : मटका (Matka) बंद झालाच पाहिजे. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत तो सुरू दिसेल, त्या पोलिस निरीक्षकांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ‘मटका बंद करा किंवा अधिकृत मान्यता द्या’, अशी मागणी केली होती. त्या विषयावर विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. खाडे यांनी जोरदार इशारा दिला.

Suresh Khade Matka Police
जयंत पाटलांचे कट्टर समर्थक मानसिंगरावांचा कोणाला पाठिंबा, साहेब की दादा? 'या' बैठकीला उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण

शहरात जागोजागी वाढत निघालेल्या टपऱ्या आधी उचला. तेथे मटका चालतो आणि दारू विकली जातेय. त्यामुळे आयुक्तांनी त्यावर कारवाई करावी, असे आदेश दिले. वास्तविक बारा महिन्यांच्या कालावधीत तीनवेळा पालकमंत्र्यांनी अवैध व्यवसाय रोखण्याकरिता कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनास दिल्या होत्या.

खाडे म्हणाले, ‘जिल्ह्यासह शहरात कोठेही अवैध व्यवसाय चालू राहता कामा नयेत. यासाठी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने सजग राहिले पाहिजे. कॉँग्रेसच्या ज्या लोकप्रतिनिधींनी अवैध व्यवसायपान सुरू असल्याची तक्रार केली आहे, त्यांच्याशी संपर्क साधा, जेथे अवैध व्यवसाय सुरू आहेत त्या ठिकाणांची माहिती त्यांच्याकडून घ्या आणि व्यवसायांवर धडक कारवाई करा.

Suresh Khade Matka Police
Maratha Reservation : 'जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल, त्‍याला आता सुटी नाही'; जरांगे-पाटलांचा स्पष्ट इशारा

नागरिकांनीही त्यांना कोठे गैरप्रकार आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस निरीक्षकांनी त्यांच्या हद्दीत अवैध व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी दक्षता घ्यावी. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गैरप्रकार वाढलेले निदर्शनास येतील त्या संबंधित निरीक्षकावर कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षकांना दिल्या आहेत.’

दरम्यान, पालकमंत्र्यांचे निर्देश आणि इशारे कोणतीही यंत्रणा गांभिर्याने घेत नसल्याचेच दिसत आहे. परिणामी अवैध व्यवसाय या एकाच विषयावर त्यांना वारंवार केवळ इशारे द्यावे लागत असल्याचे चित्र सांगलीकरांसमोर आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले यांनी कॉफी शॉपमध्ये सुरु असलेल्या गैरप्रकाराविरोधात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली होती.

Suresh Khade Matka Police
Jyotiba Dongar : दख्खनचा राजा जोतिबा देवाचा आज जागर; सोहळ्याला दीड लाखांवर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता

मात्र, पोलिसांनी याकडेही गांभिर्याने लक्ष घातले नाही. या पार्श्‍वभूमीवर पत्रकार बैठकीत अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पालकमंत्री खाडे यांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा राग आळवला आहे.

Suresh Khade Matka Police
Raju Shetti : 400 रुपये घेतल्याशिवाय उसाचे कांडेसुध्दा तोडू देणार नाही; राजू शेट्टींचा साखर कारखान्यांना स्पष्ट इशारा

विमानाच्या घिरट्यांची चौकशी

कवलापूर, तासगाव परिसरात अतिशय कमी उंचीवर विमान घिरट्या घालत आहे. त्याची चौकशी केली जाईल. ते विमान कुणाचे आहे, त्याला इतक्या कमी उंचीवरून फिरवण्याची परवानगी कशी दिली, याची जिल्हा प्रशासन माहिती घेईल, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.