Ram Rangoli Record: सांगलीच्या आदमअलीने साकारली प्रभू श्रीरामाची रांगोळी; तब्बल 200 टन गुजराती रांगोळीचा वापर, होणार 'विश्वविक्रम'

प्रभू श्रीराम अयोध्येत (Ram Temple in Ayodhya) विराजमान होत असताना देशभर विविध उपक्रम सुरू आहेत.
Rangoli Ayodhya Lord Sri Rama
Rangoli Ayodhya Lord Sri Rama esakal
Updated on
Summary

राम म्हणजे सर्वांसाठी आदराचा विषय. भारतीय संस्कृतीचा शिरोबिंदू म्हणून गणल्या जाणाऱ्या रामाची रांगोळी माझ्या हातून साकारण्याचे भाग्य लाभते आहे. - आदमअली मुजावर

सांगली : प्रभू श्रीराम अयोध्येत (Ram Temple in Ayodhya) विराजमान होत असताना देशभर विविध उपक्रम सुरू आहेत. गोवा (Goa) राज्यातील वाळपई येथे शंभर बाय पन्नास फुटाची रांगोळी रेखाटली जात आहे. रंगावलीकार आहेत सांगलीतील आरग (ता. मिरज) येथील आदमअली मुजावर (Adam Ali Mujawar). २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या उद्‍घाटन तिथीपर्यंत ही रांगोळी असेल.

गुरुवारी (ता. ११) रांगोळी रेखाटण्यास मुजावर व त्‍यांच्या सहकाऱ्यांनी प्रारंभ केला. अखंड ५० तास कार्यरत राहून ही रांगोळी साकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी मुजावर यांना रांगोळी रेखाटण्याचे निमंत्रण दिले.

Rangoli Ayodhya Lord Sri Rama
20 हजार चौरस फूट जागेवर मिरजेत साकारतेय राम मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती; 1 कळस, 22 शिखरे, 150 कमानी, 167 खांबांची निर्मिती

कळंबी (ता. मिरज) येथील अजितराव घोरपडे विद्यालयात कलाशिक्षक असणाऱ्या मुजावर यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, (स्व.) बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले, एपीजे अब्दुल कलाम, महाभारत, शिवराज्याभिषेक प्रसंग, भगवान बाहुबली, महावीर यांच्यासह ऐतिहासिक रांगोळ्या रेखाटल्या आहेत. बहुतांश रांगोळ्यांची विश्वविक्रमी नोंद झाली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्‍या हुबेहूब प्रतिकृतीसह प्रभू रामचंद्र रेखाटण्यात येईल. ती पूर्ण झाल्यानंतर विधिवत पूजनानंतर सर्वांना पाहण्यासाठी खुली केली जाईल.

Rangoli Ayodhya Lord Sri Rama
Golden Gate: राम मंदिरात लागला पहिला सोन्याचा दरवाजा; जाणून घ्या काय आहे खास? पाहा फोटो

रांगोळीची प्रमुख वैशिष्ट्ये

  • खास नायनल रांगोळीचा वापर

  • गुजरात राज्यातील शुद्ध व सफेद रांगोळी

  • प्रभू रामचंद्रांची उंची ८० फूट

  • सुमारे १४ फुटांचा चेहरा

  • विविधरंगी १५० ते २०० टन रांगोळीचा वापर

  • विविध रंगाच्या दीडशे ते दोनशे छटा

  • ५० तासांत पूर्ण करण्याचा संकल्प

राम म्हणजे सर्वांसाठी आदराचा विषय. भारतीय संस्कृतीचा शिरोबिंदू म्हणून गणल्या जाणाऱ्या रामाची रांगोळी माझ्या हातून साकारण्याचे भाग्य लाभते आहे. त्यासाठी १५ दिवसांपासून पूर्वतयारी सुरू होती. विशेष बाब म्हणून विश्वविक्रमात नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माझ्यासह सुरेश छत्रे, दत्ता मागाडे, सत्तू कुडचे, अभिजित सुतार या प्रमुख रंगावलीकारांचे मिळणारे सहकार्य अनमोल आहे.

-आदमअली मुजावर, विश्वविक्रमी रंगावलीकार, आरग (जि. सांगली)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.