Ajit Pawar : पुरे झालं पाडायचं, आता लढायचं! निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटाची भूमिका

जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सांगली, मिरजेतील प्रमुख शिलेदार अजित पवार गटाच्या गळाला लागले आहेत.
Jayant Patil Ajit Pawar
Jayant Patil Ajit Pawaresakal
Updated on
Summary

काँग्रेसनेत्या जयश्री पाटील या अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्या अजितदादा गटात प्रवेश करतील, अशी प्राथमिक माहिती मिळते.

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा धावता दौरा आणि निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटाला जिल्ह्यात बांधणीला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांचे सांगली, मिरजेतील प्रमुख शिलेदार त्यांच्या गळाला लागले आहेत. जिल्ह्यातही ‘फिल्डिंग’ लागली आहे. मात्र या लोकांना आता ‘पाडायचे’ राजकारण नकोय, त्यांना लढायचे आहे.

हक्काच्या विधानसभा घेऊन ताकद दाखवायची आहे. ती मांडणी कशी होते, यावर या गटाची बांधणी आकाराला येईल, असे प्राथमिक चित्र समोर येत आहे. काँग्रेसमध्ये (Congress) फूट पडून सन १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्या वेळी वसंतदादा घराण्यात फूट पडली आणि विष्णुअण्णांचा गट राष्ट्रवादीत गेला. मदन पाटील यांच्यासह जयंत पाटील, आर. आर. पाटील, राजेंद्र देशमुख, पृथ्वीराज देशमुख, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर राष्ट्रवादीत गेले. आता पवार कुटुंबात फूट पडली आहे.

Jayant Patil Ajit Pawar
Loksabha Election : महायुती की महाविकास आघाडी? लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय

या टप्प्यावर अजितदादा गटाच्या जिल्ह्यातील बांधणीला वेग येण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात पक्षाचे उपद्रवमूल्य जागोजागी दाखवले. ‘लढले कमी अन् पाडले अधिक,’ असे त्याचे वर्णन करता येईल. जयंतरावांचा हात सोडून अजितदादांची साथ देताना जयंतरावांच्या शिलेदारांना आता स्वतःसाठी ‘स्पेस’ हवी आहे. ती विधानसभा आणि महापालिकेत हवी आहे. भाजपमध्ये प्रचंड गर्दी आहे.

त्यामुळे अजितदादांना ही बांधणी करताना भाजपला विश्‍वासात घेणे आणि महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा या निवडणुकांत गटात येऊ इच्छिणाऱ्यांना सन्मानाचे स्थान देण्याचा शब्द देणे, हेच आव्हान आहे. काहींना या सन्मानापेक्षा ‘सत्ता’ महत्त्वाची आहे, ते सन्मानाच्या बेरजेत अडकणारे नाहीत.

Jayant Patil Ajit Pawar
Good News : साताऱ्याला जोडणाऱ्या रेल्‍वेसेवांच्या विस्‍तारास रेल्‍वेमंत्र्यांची मंजुरी; उदयनराजेंनी दिली महत्त्वाची अपडेट

राज्यात अजितदादा गटाची बांधणी वेगाने झाली. तुलनेत जिल्ह्यात संथ आहे. एकीकडे, जयंत पाटील यांचा प्रभाव, दुसरीकडे आर. आर. आबा गटाचा शरद पवार यांना अधिक ‘सॉफ्ट कॉर्नर’ ही प्रमुख कारणे होती. यापलीकडे राष्ट्रवादीचा प्रभाव मर्यादित आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीला सुरुंग लावण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला. त्याची सुरवात सांगली, विट्यातून केली. आता दादांसोबत येऊ इच्छिणाऱ्यांना विधानसभेला काही जागा अपेक्षित आहेत. प्रा. पद्माकर जगदाळे यांच्यासारखे नेते विधानसभा लढवू इच्छितात.

सांगली, मिरज, तासगाव, खानापूर येथे भाजप प्रभावी आहे. शिराळ्यात भाजपची तयारी जोरदार सुरू आहे. खानापूर शिवसेनेकडे आहे. जत भाजपमध्ये गोंधळ आहे. इस्लामपुरात जयंतरावांना घेरण्याची संधी आहे. अशा स्थितीत अजितदादा अधिक संधी कुठे शोधतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Jayant Patil Ajit Pawar
Loksabha Election : बेळगावातून सतीश जारकीहोळी, चिक्कोडीतून कोण? लोकसभेसाठी 14 काँग्रेस उमेदवारांची यादी व्हायरल

मिरजेचे गणित

मिरजेत अजितदादा गट मजबुतीने बांधणी करतोय. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचा प्रवेश झाला, पद दिले. मैनुद्दीन बागवान इच्छुक आहेत, मात्र नायकवडी व बागवान यांच्यात आडवा विस्तव जात नाही. त्यांचा वाद मिटला की जमेल, असे सांगितले जाते. तोवर आवटी पॅड बांधून तयार असल्याचे सांगितले जाते. मिरज पूर्व भागातून मनोज शिंदे-म्हैसाळकर यांचे शिलेदारही संपर्कात येत असल्याचा दावा केला जातोय. ही बांधणी भाजपसाठीही डोकेदुखी ठरू शकते. कारण मिरज भाजपचा गड आहे, असे मानले जाते.

जयश्रीताईंना सूचना, थांबा आणि वाट पाहा

काँग्रेसनेत्या जयश्री पाटील या अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्या अजितदादा गटात प्रवेश करतील, अशी प्राथमिक माहिती मिळते, मात्र अजितदादांनी त्यांना थांबा आणि वाट पाहा, असा सबुरीचा सल्ला आहे. जयश्रीताई विधानसभेसाठी प्रबळ दावेदार मानल्या जातात. नव्या राजकीय समीकरणांमध्ये उभी-आडवी मांडणी होऊ शकते का, याची चाचपणी भाजप आणि अजितदादा गट संयुक्तपणे करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()