"सीएए' समर्थनार्थ पाथर्डीत मोर्चा

agitation at Pathardi in support of CAA
agitation at Pathardi in support of CAA
Updated on

पाथर्डी (नगर) : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ शहरातील हिंदू रक्षा युवा मंचासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी मंगळवारी (ता.7) तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. "भारत माता की जय', "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,' "देशाचे अखंडत्व कायम राहो,' आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नागरिकांनी केंद्र सरकारच्या "सीएए' कायद्याचे जोरदार समर्थन केले. 

हिंदु रक्षा युवा मंच, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जैन यूथ फेडरेशन, माहेश्‍वरी युवक मंडळ, सुवर्णयुग तरुण मंडळ, नेता सुभाष मंडळ, व्यापारी तरुण मंडळ यांच्या समर्थकांनी मोर्चात सहभाग नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील नवी पेठ, अजंठा चौक, (स्व.) वसंतराव नाईक पुतळा ते तहसील कार्यालय, असा मोर्चा नेण्यात आला. मोर्चात साडे तीनशे फूट लांबीचा तिरंगा लक्ष वेधून घेत होता.

नागरिकांना कायद्याची माहिती

सोमनाथ झाडे यांनी सुधारित नागरित्व कायद्याची माहिती दिली. तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले. नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माणिक खेडकर, दीपक महाराज काळे, मंगल कोकाटे, सिंधूबाई साठे, अशोक गोरे, अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, जनार्दन वांढेकर, सोमनाथ बंग, महेश बाहेती, संतोष सोनटक्के, महेंद्र परदेशी आदी या वेळी उपस्थित होते. 

श्रीरामपुरात विरोधात मोर्चा

दरम्यान, सोमवारी (ता.6) सुधारित नागरित्व कायद्याविरोधात (सीएए) श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीयांतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. "संविधानविरोधी सरकार, चला करू या हद्दपार', "कल लढे थे गोरों से, आज लढेंगे चोरों से', "हम क्‍या चाहते "एनआरसी'से आजादी', "संविधान के साथी, हम सब भारतवासी', "झिंदाबाद, झिंदाबाद संविधान झिंदाबाद', "भारत माता की जय' अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. यानिमित्ताने आंदोलनात सर्वपक्षीय व सर्वधर्मीय जनसागर एकवटला. संविधान बचाव कृतिसमितीतर्फे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील व पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांना निवेदन देण्यात आले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.