अजितदादांच्या उपमुख्यमंत्रीपदाला हरकत नाही

Ajit Dada's deputy chief minister no problem
Ajit Dada's deputy chief minister no problem
Updated on

नगर ः महाविकास आघाडीत खाते वाटपाबाबत कोणत्याही अडचणी नाहीत. उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना मिळाले तर कोणाचीही हरकत नाही. नागपूर अधिवेशनानंतर महिनाअखेरपर्यंत खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, आमदार संग्राम जगताप, युवा जिल्हाध्यक्ष संदीप बोरसे आदी उपस्थित होते. 

आमदार वळसे म्हणाले, अजित पवार पक्षात सक्रिय आहेत. ते उपमुख्यमंत्री झाले तर कोणाचीही हरकत नाही. मंत्री मंडळाच्या खाते वाटपाचा व खाते विस्ताराचा विषय हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. नागपूर अधिवेशनानंतर डिसेंबरअखेरपर्यंत हा विषय पूर्णत्वाला जाईल. 

जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी 

जाहीरनाम्यामध्ये जे वचन दिले आहे ते आम्हाला पाच वर्षांमध्ये पूर्ण करायचे आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांत महाविकास आघाडी होण्यासाठी कमिटी तयार केली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांत महाविकास आघाडी संदर्भातील निर्णय कमिटी घेईल. जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी स्थापन झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरही चर्चा होईल. सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम ठरला आहे. प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना तशा सूचना देईल, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. 

रोहित पवारांनी परवानगी घेतलीय 

आज नगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी रोहित पवार यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती. यावर वळसे पाटील म्हणाले, रोहीत पवार यांनी कार्यक्रमास अनुपस्थित राहण्याबाबत माझी पूर्वपरवानगी घेतली आहे, असे स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.