सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवार-उद्धव ठाकरेंचा झाला होता समझोता; अजितदादांच्या प्रवक्त्याचा मोठा गौप्यस्फोट

'सन २००४ मध्ये काँग्रेसहून अधिक आमदार निवडून येऊनही सक्षम नेता नसल्याने शरद पवारांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद घेतले नाही.'
Supriya Sule Sharad Pawar Ajit Pawar
Supriya Sule Sharad Pawar Ajit Pawaresakal
Updated on
Summary

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची रश्मी ठाकरे यांची इच्छा होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे शरद पवारांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे आणले.

सांगली : राज्यात महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यानंतर अडीच वर्षांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात गुप्त समझोता झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याचे ते एक महत्त्वाचे कारण असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.

शरद पवार यांनी, अजित पवार (Ajit Pawar) सक्षम नव्हते आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मुख्यमंत्री केल्यास पक्ष फुटेल, अशी स्थिती असल्याने पक्षाला मुख्यमंत्रिपद घेतले नसल्याचे म्हटले आहे. यावर पाटील यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत पवार यांच्या दाव्याला उत्तर दिले.

Supriya Sule Sharad Pawar Ajit Pawar
Kolhapur Politics : शरद पवारांना धक्का! कोल्हापुरातील 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी

पाटील म्हणाले, ‘‘सन २००४ मध्ये काँग्रेसहून अधिक आमदार निवडून येऊनही सक्षम नेता नसल्याने शरद पवारांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद घेतले नाही. मग, महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामपंचायत सदस्य पदापासून कसल्याही संसदीय कामकाजाचा अनुभव नसलेले उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्रिपदी चालले.’’

उमेश पाटील म्हणाले, अजित पवार तीनवेळा आमदार, एकदा खासदार झाले. विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे ज्येष्ठ नेते होते. ते मुख्यमंत्रिपदाला सक्षम नव्हते का? भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर पक्षात फूट पडली असती.

यामागे जातीय संदर्भ होता का? त्यांच्यावर दबाव होता का? हे स्पष्ट झाले पाहिजे. सन २०१९ मध्ये अडीच वर्षांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात गुप्त समझोता झाला होता. त्याची माहिती काँग्रेसला नव्हतीच, पण राष्ट्रवादीच्या नेते आणि आमदारांनाही नव्हती. पक्षफुटीचे तेही एक कारण होते. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे यांचा विरोध होता, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Supriya Sule Sharad Pawar Ajit Pawar
Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

त्याबाबत बोलताना राज्य प्रवक्ते पाटील म्हणाले, खासदार राऊत खोटी माहिती देत आहेत. शिंदे यांना कुणीही विरोध केला नव्हता. उलट उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांनी पुत्रप्रेमापोटी आदित्य यांना मुख्यमंत्री करण्याचा घाट घातला होता. आदित्य यांच्या नेतृत्वात कुणीही काम करण्यास तयार झाले नसते. त्यामुळेच सरकार चालविण्याचा कसलाही अनुभव नसताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील, जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, वसीम नायकवडी, तौफिक फकीर, उषाताई गायकवाड आदी उपस्थित होते.

Supriya Sule Sharad Pawar Ajit Pawar
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

पुत्र-पुत्रीप्रेमामुळे पक्ष फुटले

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची रश्मी ठाकरे यांची इच्छा होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे शरद पवारांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे आणले, तर अडीच वर्षांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा गुप्त समझोता झाला होता. या बाबी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी समजल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्याचा दावा उमेश पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.