Crocodile : सावधान! नदीकाठी मगरीचा वावर

गेल्या दोन दिवसांपासून नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. नदीकाठी मगरीचा वावर दिसून येत आहे.
Crocodile
Crocodilesakal
Updated on

सांगली - गेल्या दोन दिवसांपासून नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. नदीकाठी मगरीचा वावर दिसून येत आहे. आज सकाळी हरिपूरच्या बाजूला काठावर महाकाय मगरीचे दर्शन अनेकांना झाले. त्यामुळे नदीकाठी जाताना सावधगिरी बाळगा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

कृष्णा नदीत मोठ्या मगरी आहेत. अनेकदा आयर्विन पुलावरून मगरीचे दर्शन होत असते. सद्यःस्थितीत पाणी पातळी वाढली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने मगरी नदीकाठी आल्या आहेत. आज सकाळी वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सची टीम बोटीने शोध घेत होती.

त्यावेळी हरिपूरच्या भागातील नदीकाठी महाकाय मगर दिसून आली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. काही वेळांनंतर ती मगर पुन्हा पाण्यात गेली. तेथून पुढे काही अंतरावर आणखी एक मगर दिसून आली. तरी शेतात गेल्याचे दिसले, अशी माहिती ‘एसआरएफ’च्या पथकाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.