शिर्डी : ""समाजाच्या प्रगतीवरच देशाची प्रगती अवलंबून आहे. शेतकरी आत्महत्यांमुळे देशाचे प्रचंड नुकसान होत आहे. सरकारच्या चांगल्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कुर्मी (कुणबी) समाजाचे ऐक्य देशाला बळकटी देणारे ठरत आहे,'' असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांनी केले.
हेही वाचा शिंगणापुरात होणार "लटकू हटाव' मोहीम
अखिल भारतीय कुर्मी (कुणबी) क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाची शानदार सांगता शिर्डी येथे झाली. माजी केंद्रीय मंत्री खासदार अनुप्रिया पटेल, खासदार विजय बघेल, ब्रिगेडियर सुधीर सावंत, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मराठा सेवा संघाचे विजयकुमार ठुबे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा रोहित पवारांचे मिशन पंचायत समिती
अधिवेशनात अध्यक्षस्थानी महिला अध्यक्ष लता चंद्राकार होत्या. "युवा विकास व भविष्य' या परिसंवादात मध्य प्रदेशाचे मंत्री कमलेश्वर पटेल यांनी युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. कुर्मी समाज युवकांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राष्ट्रीय समन्वयक संजीव भोर यांनी सर्व प्रमुख अतिथींचा शाल, स्मृतिचिन्हे देऊन सन्मान केला.
हेही वाचा "सकाळ'मुळे एमपीसीबीला जाग
राष्ट्रीय महासचिव डॉ. व्ही. एस. निरंजन यांनी महासभेचा लेखाजोखा मांडला. राज्याध्यक्ष डॉ. मंगेश देशमुख, सचिन चौघुले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. महिला कोषाध्यक्ष ममता पटेल यांनी सूत्रसंचालन केले. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर व अखिल भारतीय कुर्मी (कुणबी) मराठा क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष एल. पी. पटेल यांनी आभार मानले.
राजसत्तेसाठी समाजाला सशक्तीकरणाची गरज
""राजकीयदृष्ट्या कोणताही समाज जोपर्यंत सशक्त होत नाही, तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाही. राजसत्तेसाठी समाजाला सशक्तीकरणाची गरज आहे. समाजात नेता बनविण्यापेक्षा नेतृत्व करायला शिकवले पाहिजे. त्यासाठी नवीन नेतृत्व निर्माण केले पाहिजे. ''
- माजी केंद्रीय मंत्री खासदार अनुप्रिया पटेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.