अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पुन्हा पत्र 

Anna Hazare's letter to the Prime Minister again
Anna Hazare's letter to the Prime Minister again
Updated on

राळेगणसिद्धी : दिल्लीतील "निर्भया'वरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील दोषींना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम कायदा करावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र पाठवून केली आहे. "निर्भया'च्या गुन्हेगारांना फाशीची अंमलबजावणी होईपर्यंत मौन आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार हजारे यांनी त्यात व्यक्त केला आहे. 

हजारे यांच्या मौनव्रत आंदोलनाचा आज अकरावा दिवस होता. हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना 9 डिसेंबर रोजी पाठविलेल्या पत्राचे स्मरण करून देणारे पत्र पाठविले. या पत्रात हजारे यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत केंद्र सरकारने सक्षम कायदा तयार करावा, यासह महाराष्ट्रातील ग्रामसुरक्षा दलासारखा महिला सुरक्षा दलाचाही कायदा करावा, शहरात वॉर्ड स्तर व खेड्यात गावस्तरावर महिला सुरक्षा दलाची स्थापना करावी, अशा मागण्याही केल्या आहेत.

महिलांवर अनेक राज्यांत अत्याचार होत आहेत. हा प्रश्न फक्त राज्याचा नसून देशाचा आहे. त्यासाठी सक्षम व कठोर कायदा लोकांच्या सहभागातून व्हावा. महिलांवरील अत्याचाराला पायबंद घालावा यासाठी चांगले काम करणारे वकील, महिला मंडळे, काही सामाजिक संस्था व जनतेतून मते घेऊन केंद्राने व राज्यानेही सक्षम कायदा करावा, असे अण्णांनी सुचविले आहे. 

राज्यभरातून लोकांचा ओघ सुरूच 
मौन आंदोलनाच्या अकराव्या दिवशी आज पुणे, वर्धा, औरंगाबाद, नगर, जालना, सातारा, सांगली, अमरावती, नागपूर, अकोला आदी जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी अण्णांची भेट घेऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. अण्णांना सध्या राज्य व देशभरातून पाठिंबा वाढत आहे. 

नगरचे प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील आणि पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी अण्णांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पोलिस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, पोलिस कॉन्स्टेबल महेश आव्हाड आदी त्यांच्या समवेत होते. 

लोकायुक्त कायदा करावा 
राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहा सचिव व आपल्या समितीचे पाच सदस्य यांनी मागील काळात तीन महिने चर्चा करून राज्यासाठीच्या लोकायुक्त कायद्याचा मसुदा (ड्राफ्ट) तयार केला आहे. त्यानुसार लोकायुक्त कायदा विधानसभेच्या पुढील अधिवेशनात तयार करावा, अशी मागणीही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्याशी लेखी संवादात केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.