बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणत अण्णांनी सोडलं मौन

Anna will leave the silent movement after hanging of criminals in delhi
Anna will leave the silent movement after hanging of criminals in delhi
Updated on

राळेगण सिद्धी - आपल्या देशात न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. निर्भयाच्या चार मारेक-यांना फाशी होण्यास सात वर्षे लागली, तरीही आज दिल्लीत फाशी झाल्याने देर हैर लेकीन अंधेर नही असा संदेश हा संदेश महत्वाचा आहे. ख-या अर्थाने निर्भयाला न्याय मिळाला आहे. त्यामुळे न्यायवस्थेवर जनतेचा विश्वास वाढला आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आणखी कठोर कायदे करण्याबरोबरच, पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे असल्याचे हजारे म्हणाले.

निर्भयाच्या मारेक-यांना आज दिल्लीत फाशी दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गत वर्षी २० डिसेंबरपासून सुरू केलेले मौन तीन महिन्यांनंतर सकाळी १० वाजताच्या सुमारास सोडले. हजारे यांनी नित्यकर्म आवरल्यानंतर संत यादवबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ध्यानधारणा केल्यानंतर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असे म्हणत मौन सोडले.

पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले, निर्भयाच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा झाल्याने ख-या अर्थाने निर्भयाला न्याय मिळाला. निर्भयाला न्याय मिळण्यास सात वर्षे लागली. पोलिस चौकशी, कायदा, न्यायव्यवस्थेत कुठे उणिवा राहिल्या का याचा अभ्यास होण्याची गरज आहे. त्यातून महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा.

राज्य सरकारने तसा कठोर कायदा करणार असल्याचे लेखी पत्र आपणाला पाठविले आहे. कठोर कायद्याबरोबच पालकांनी लहान मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. अशा संस्कारातून समाजातील इतर महिलांबाबत बहिण, आई असे नाते तयार होते. महिलांवरील अत्याचार रोखण्याला त्यामुळे आळा बसेल.

ते बिल चांगले...
सन २०१२ मध्ये आपण केंद्र सरकारकडे पोलिस रिफॉर्म बील व ज्युडिशिएलटी अकाऊंटबिअॅलीटी बील सदर केले होते. ती दोन्ही बिले अतिशय सुंदर आहेत. पोलिस तपासात विलंब लागू नये यासाठी पोलिस रिफॉर्म बील महत्वाचे आहे. तर ज्युडिशिएलीटी बिलामुळे न्याय मिळण्यास विलंब कमी होऊ शकेल. हे कायदे झाले असते तर निर्भयाच्या मारेक-यांना फाशीस सात वर्षे विलंब लागला नसता, असे हजारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.