Sangli Municipal Corporation
Sangli Municipal Corporationesakal

अबब..! सांगली शहरात भररस्‍त्यावर पडला पुन्हा मोठा खड्डा; शंभर फुटीचे लोण आता कोल्हापूर रस्त्यापर्यंत..

Sangli Municipal Corporation : सांगली शहरातील रस्त्यांवर अचानक खड्डे पडण्याची मालिका थांबायचे नाव घेत नाही.
Published on
Summary

शहरात शंभर फुटी रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी अचानक भलामोठा खड्डा पडला. रस्त्याचे काम नुकतेच झाल्यानंतर पडलेला हा खड्डा नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला.

सांगली : शहरातील रस्त्यांवर अचानक खड्डे पडण्याची मालिका थांबायचे नाव घेत नाही. शंभर फुटी रस्त्यावर सुरवात झालेली खड्डे पडण्याची मालिका कोल्हापूर रस्त्यापर्यंत जाऊन पोहोचली. सकाळी ९.३० वाजता एक अवजड वाहन गेल्यानंतर कबाडे हॉस्पिटलमागील (Kabade Hospital) रस्त्यावर खड्डा पडल्याची घटना घडली. महापालिकेने (Sangli Municipal Corporation) तत्काळ हा रस्ता बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

शहरात शंभर फुटी रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी अचानक भलामोठा खड्डा पडला. रस्त्याचे काम नुकतेच झाल्यानंतर पडलेला हा खड्डा नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला. काही दिवसांनी त्याच रस्‍त्यावर पुन्हा खड्डा पडला. गारपीर चौकानजीक भर रस्त्यावर पडलेला हा खड्डा आधी पडलेल्या खड्ड्यापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर होता. रस्ता खचून पडणारे हे खड्डे जीवघेणे ठरण्याआधी महापालिकेने त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केली.

Sangli Municipal Corporation
तुपात चरबीचा अंश आढळला अन् सरकार खाडकन् झालं जागं; आता तुपाच्या टँकरवर असणार GPS, इलेक्ट्रॉनिक लॉक

तिसरा खड्डाही त्यानंतर काही दिवसांनी पडल्यानंतर मात्र महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. अचानक पडणारे हे खड्डे महापालिकेची काळजी वाढवणारे ठरत आहेत. तिसऱ्या खड्ड्यानंतर मात्र महापालिकेने त्यांची कारणमीमांसा करण्यासाठी यंत्रणा कामाला जुंपली. पाणीपुरवठा विभागाकडून ड्रेनज पाईपची तपासणी करण्यात आली. पाणीपुरवठ्याची पाईप नादुरुस्त झाल्याने पुन्हा दोन दिवस त्यात गेले. शेजारील गटाराचे पाणी पाझरल्याचे निमित्त होऊन हा खड्डा पडल्याचा ‘जावईशोध’ महापालिकेने लावला. एकाच रस्‍त्यावर काही अंतराने पडणारे हे ‘खड्डेपुराण’ दोन महिन्यांपासून सुरूच आहे.

Sangli Municipal Corporation
Tembu Yojana : 'टेंभू'च्या सहाव्या टप्प्याला अनिल बाबरांचे नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची भरसभेत ग्वाही

कोल्हापूर रस्त्यावर काल सकाळी कबाडे हॉस्पिटलमागील अंतर्गत मार्गावर पुन्हा खड्डा पडला. सकाळी ९.३० च्या दरम्यान घडलेल्या या घटनेने बघ्यांची गर्दी झाली. अवघ्या काही मिनिटांपूर्वी तेथून एक मालवाहू ट्रक गेल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याखाली भूमिगत ड्रेनेज वाहिनी गेली आहे. ती जुनाट होऊन खचल्याने खड्डे पडत असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने बॅरिकेडस् लावून हा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद केला आहे. त्यामुळे परिसरातील वाहनधारक तसेच विद्यार्थी-ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या जेसीबीने हा खड्डा रुंदवून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केली. गेल्या दोन महिन्यात पडलेला हा तब्बल पाचवा खड्डा समाजमाध्यमांवर व्हायरल होताच उलटसुलट चर्चांना सुरवात झाली. सांगलीत खड्डे कसे पडतात, यावर मजेशीर ‘मीम्स’, विनोदांनी समाजमाध्यमांच्या भिंती रंगल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.