चांदोली वन्यजीव विभागामध्ये २०१८ नंतर प्रथमच १७ डिसेंबर २०२३ रोजी वाघ आढळला होता.
शिराळा : चांदोली राष्ट्रीय उद्यानात (Chandoli National Park) दुसऱ्या वाघाचे अस्तित्व आढळले आहे. काल रात्री अधिवास देखरेखीसाठीच्या कॅमेऱ्यात रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी वाघाचे काही फोटो मिळाले असून, गस्तीदरम्यान वाघाच्या पावलांचे ठसेही मिळाले. व्याघ्र प्रकल्पाच्या (Tiger Reserve) टायगर सेलच्या संशोधन विभागाने या फोटोंचे विश्लेषण केल्यानंतर आधीच्या ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह टी-१’चे ते नसून दुसऱ्याच वाघाचे असल्याचे सिद्ध झाले आहे.