बेळगाव कॅण्टोन्मेंट बोर्डातर्फे विविध जागासाठी अर्ज

सफाईवाला, द्वितीय दर्जा सहाय्यक, शिफाई व माळी जागेचा समावेश
Application for various posts from Belgaum
Application for various posts from Belgaum sakal
Updated on

बेळगाव : कॅण्टोन्मेंट बोर्डाने सफाईवाला, द्वितीय दर्जा सहाय्यक, शिफाई व माळी या जागासाठी अर्ज मागविले आहेत. बोर्डाच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करता येणार आहे. यासाठी https://belgaum.cantt.gov.inrecruitment या संकेतस्थळारून अर्ज डाऊनलोड करता येणार आहेत. १ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(Application for various posts)

Application for various posts from Belgaum
Exclusive Interview : लेफ्टनंट कर्नल सतिश ढगे; पाहा व्हिडिओ

पात्र उमेदवारांनी बोर्डाच्या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करावा. सफाईवालाची एक जागा ओबीसी उमेदवारांसाठी रिक्त आहे. उमेदवार २८ वर्षाचा असून त्याचे किमान ७ वी पर्यंतचे शिक्षण झालेले असावे. त्याला १७००० ते २८९५० पर्यंत पगार आहे. द्वितीय दर्जा सहाय्यकाची एक जागा सामान्य वर्गासाठी रीक्त आहे. २५ वयापर्यंत असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी पीयुसी किंवा डिप्लोमा आवश्‍यक आहे. २१४०० ते४२००० पर्यंत पगार आहे.

शिपाईची एक जागा रीक्त आहे. ओबीसी उमेदवार अर्ज करू शकतो. यासाठी २८ वयाची मर्यादा आहे. १० पर्यंत शिक्षण असणे आवश्‍यक असून यासाठी १७००० ते २८९५० पर्यत पगार आहे.

Application for various posts from Belgaum
जलतरण तलाव अन् खेळाची मैदाने सुरू करा; अजित पवार यांचे आदेश

माळीची एक जागा सामान्य वर्गासाठी रीक्त आहे. २५ वयापर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते. यासाठी १० वी पास, फलोत्पादन खात्याच्यामार्फत ट्रेनींग आवश्‍यक आहे. यासाठी १७ हजार ते २८९५० पगार आहे.

कॅण्टोन्मेंट बोर्डाने सुमारे एक दिड वर्षापूर्वी एक जाहीरात काढून विविध जागा भरल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा पात्र उमेदवारांना ही संधी देण्यात आली आहे. अधिक माहिती बोर्डाच्या बेवसाईटवर देण्यात आली आहे. तसेच खानापूर रोडवरील बोर्डाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.