दादांकडून सांगलीकरांचे कौतुक  ः वाचा

download.jpg
download.jpg
Updated on

सांगली ः "कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे, म हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं, दरम्यान सांगलीत प्रशासनाने चांगली यंत्रणा राबवली. त्यामुळे सांगली करोनामुक्त झाला आहे. तेथील डॉक्‍टर, पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे कौतुकच करावे लागेल असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 

तसेच प्रस यापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचं पालन करावं, गर्दीत जावून स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्‍यात घालू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबई येथे केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार नांदेड, सांगलीबाबत म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारं, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील प्रत्येक जण जोखीम पत्करुन आज कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांनी घरातंच थांबून साथ द्यावी, ही त्यांची अपेक्षा आहे.

नागरिकांनी दाखवलेला संयम, सहकार्यामुळेच राज्यातील काही जिल्हे आजही कोरोनामुक्त आहेत. नांदेड, सांगलीसारखे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापासून बोध घेऊन आपला जिल्हाही कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातंच थांबण्याचा निर्धार केल्यास कोरोनाच्या लढाईत विजय नक्की आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात, मालेगाव सारख्या शहरात पुढचे काही दिवस टाळेबंदी नियमांचं मनापासून, स्वयंशिस्तीनं काटेकोर पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()