Wader Bird : कृष्णाकाठी भरली छोट्या आर्लीची शाळा; कोंडार परिसरात उथळ पाण्यामुळे वाढणार पाहुण्यांचा मुक्काम

कृष्णाकाठी (Krishna River) हिवाळ्यात वेगवेगळे पक्षी दाखल होतात.
Waders Birds at Krishna River Palus
Waders Birds at Krishna River Palusesakal
Updated on
Summary

छोटा आर्ली (Waders) वाडर्स वर्गातील आहेत. या वर्गातील पक्षांचे गम बूट घातल्यासारखे आणि उंच पाय असतात.

अंकलखोप : कृष्णाकाठी (Krishna River) हिवाळ्यात वेगवेगळे पक्षी दाखल होतात. नदीची पाणीपातळी खालावल्याने उथळ पाण्यात अनेक पाहुण्या पक्षांनी आपला मुक्काम वाढवलेला दिसतो. पलूस तालुक्यातील (Palus Sangli) आमणापूर येथील कृष्णाकाठावरील कोंडार परिसरात सध्या छोटा आर्ली पक्षांची शाळा भरली आहे.

गतवर्षी चक्रवाक, भुवई बदक, छोटा आर्ली, करकरा क्रोंच हे पाहूणे पक्षी पहायला मिळाले होते.गेल्या नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये नदीची पाणीपातळी चांगली राहिली. त्यामुळे उथळ भाग बुडून पक्षांच्या हालचाली कमी दिसल्या. दरवर्षी एक दोनच्या संख्येने दिसणारे छोटे आर्ली पक्षी सध्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचे दिसत आहेत. नुकतीच या कोंडार परिसर तब्बल २७ छोटा आर्ली पक्षांची नोंद झाली असल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे.

Waders Birds at Krishna River Palus
Udayanraje Bhosale : पश्चिम घाटातील धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांसाठी तब्बल 381 कोटी; खासदार उदयनराजेंची माहिती

तो चिमणीएवढ्या आकाराचा असून पाकोळीसारखे टोकदार पंख असतो. त्याची बाणाच्या आकाराची शेपटी असते. तो संध्याकाळच्या वेळी आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडताना लहान वटवाघुळासारखा दिसतो. त्याच्या शरीराचा खालील भाग तांबूस छटा असलेला, धुरकट तपकिरी असतो. पोटाचा रंग पांढरा असतो. डोळे आणि चोचीला सांधणारी काळी पट्टी असते वर उडताना खालचा भाग पांढुरका आणि त्यावर काळ्या रेषा दिसतात.

आखूड पांढऱ्या शेपटीवर काळा ठिपका असतो. छोटा आर्ली (Wader Bird) हे समूहाने राहतात. हे पक्षी पश्चिम पाकिस्तान, भारत, नेपाळ, पूर्व पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रदेशात आढळतात. तर फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारतात त्यांची वीण होते. छोटा आर्ली पक्षाची मादी डिसेंबर ते मार्च या कालावधीत नद्या आणि तलावांजवळील रेती किंवा वाळूच्या काठावर प्रजनन करते, जमिनीवर २-४ अंडी घालते.

Waders Birds at Krishna River Palus
Nitin Gadkari : भविष्यात बेळगाव जिल्हा बनणार इथेनॉल उत्पादनाचे हब; मंत्री नितीन गडकरींची माहिती

छोटा आर्ली वैशिष्ट

छोटा आर्ली (Waders) वाडर्स वर्गातील आहेत. या वर्गातील पक्षांचे गम बूट घातल्यासारखे आणि उंच पाय असतात. पाय कोरडे राहिल्याने पाण्यात जास्त वेळ उभा राहून शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. असे असूनही छोट्या आर्लीचे एक विलक्षण वैशिष्ट म्हणजे ते सामान्यतः आपल्या पंखांच्या साहाय्याने आपली शिकार करताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.